विखेंची तीनदा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली मात्र…राम शिंदेंनी व्यक्त केली खंत

Untitled Design   2023 05 27T191702.591

Ram Shinde Speak On Radhakrishna Vikhe : भाजपमधील अंतर्गत नाराजी नाट्य हे चव्हाट्यावर आले आहे. याबाबत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली तसेच हा वाद मिटला असल्याचे देखील ते बोलले असले तर हा वाद अद्याप शामला नसल्याचे दिसून येत आहे. मी विखे यांच्या विरोधात अनेकदा पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र मला थांबण्यास सांगितलं असल्याची खंत भाजप आमदार राम शिंदे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.

अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले, विखे यांच्या संदर्भामध्ये मी पक्षातील वरिष्ठांकडे यापूर्वीही तीन वेळा तक्रारी केलेल्या होत्या. जे काही झालं ते मी स्पष्टपणे पक्षाला सांगितलेलं होतं. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नगर जिल्ह्यामध्ये आले होते. त्यांनी या संदर्भामध्ये मला थांबायला सांगितलं. मी आत्तापर्यंत दोन वेळा थांबलेलो आहे. आता तिसऱ्यांदा सुद्धा थांबायला मी तयार आहे असे देखील शिंदे म्हणाले आहे. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, मी थांबलोय पण आता त्यांच्याकडून सुद्धा तशी अपेक्षा आहे. असे बोलत शिंदे यांनी मनातील खंत मात्र कायम असल्याचेही स्पष्ट केले.

…तर मी रोहित पवारांचे मनापासून स्वागत करेल, ‘त्या’ वादावर राम शिंदेंची प्रतिक्रिया

मी याबाबत आधी ज्या तक्रारी केल्या आहेत त्याचा निर्णय प्रलंबित आहेत आणि एकाच पक्षात असल्याच्या नंतर वारंवार असे प्रसंग कोणावरही येऊ नये. भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्त आहे त्या शिस्तीचे पालन केलं पाहिजे. असे तर प्रसंग कोणाच्याही समोर येणार नाहीत असेही आमदार राम शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Ram Shinde : फडणवीसांची पाठ फिरताच विखे-शिंदेंमध्ये पुन्हा ठिणगी; मी जो दावा केला तो…

मी जो दावा केला आहे तो खराच
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीवरुन भाजपमंत्री राधाकृष्ण विखे आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. राधाकृष्ण विखेंनी बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले आहे, असा राम शिंदेंचा आरोप आहे. यावर बोलताना आज शिंदे म्हणाले, मी वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थितीजण्य जे काय झालं ते पक्षाकडे दिल. पक्षाकडे दिल असताना पक्षाने ते ऐकूनही घेतलं त्यामुळे त्याच्याकडून कोणतंही प्रत्युत्तरही काही आलेले नाही. त्यामुळे मी जो दावा केला आहे तो खराच आहे, असे म्हणतच शिंदे यांनी विखेंवर निशाणा साधला.

Tags

follow us