Ramdas Athawale : नाव बदलून शहराचा विकास होत नसतो
नाशिक – कोणत्याही शहराचे नाव बदल्याने विकास होत नाही. पण या दोन्ही शहरांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी भाग आहे तिथं पाण्याचे स्त्रोत तयार केल्यास त्या भागाचा विकास होईल. औरंगाबाद शहरात देखील चांगली विकासकामे सुरु आहेत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सांगितले.
रामदास आठवले नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांची कटपुतली नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे. या शब्दांत रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले आहे.
आता शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होईल. त्यामध्ये आरपीआयला चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
आमच्या पक्षाला स्वत:च चिन्ह नसल्याने दुसऱ्या पक्षाच्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागते. पण आमचे लोक कमळावर निवडूण आले तरी ते भाजपमध्ये जात नाहीत. आमच्या पक्षाला कायमचं चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
‘वंचितने मतं खाण्यापेक्षा उमेदवार निवडणून आणावे’, Rohit Pawar यांचा टोला
नागालॅंड, मेघालय आणि त्रिपुरा राज्यात आरपीआयची चांगली स्थिती आहे. या राज्यात आमच्या एक-दोन जागा निवडूण येण्याची शक्यता आहे. नॉर्थ-ईस्टमध्ये आमचा पक्ष मजबूत होत आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.