महसूलमंत्री विखेंच्या जिल्ह्यात वाळूतस्करांची दहशत ! अधिकारी, कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

  • Written By: Published:
महसूलमंत्री विखेंच्या जिल्ह्यात वाळूतस्करांची दहशत ! अधिकारी, कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न

Ahmednagar Crime : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या नगर जिल्ह्यामध्ये जोरदार वाळूतस्करी होत आहे. ही वाळूतस्करी रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हा गौण खनिज अधिकारी व पोलिस पथकावर वाळूतस्करांनी हल्ला करत त्यांच्या अंगावर डम्पर खालून चिरडण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला रोखण्यासाठी पथकात असलेल्या पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी हवेत गोळीबार केला आहे. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ही थरारक प्रकार घडला आहे.(sand smugglers attack on revenue squa godavari-river)


शिवसेना ठाकरे गटाचा आणखी एक शिलेदार शिंदे गटात…; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

श्रीरामपूरमधील गोवर्धनपूर येथे सरकारी वाळू डेपो सुरू करण्यात आला आहे. केवळ सहाशे रुपये ब्रॉसने नागरिकांना वाळू देण्यात येत आहे. डेपोपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर जोरदार वाळूतस्करी सुरू असल्याची तक्रार महसूल विभागाकडे झाली होती. या वाळूतस्करीवर कारवाई करण्यासाठी सोमवारी रात्री जिल्हा गौण खनिज अधिकारी वसीम सय्यद, रॉयल्टी निरीक्षक अशोक कुलथे, पोलिस कर्मचारी बारवकर, गणेश शिंदे असे पोलीस व महसूल विभागाचे संयुक्त पथक कारवाईसाठी गेले होते.

पक्ष फुटला आधी तो सांभाळा; महाराष्ट्र सांभाळायला आम्ही समर्थ; CM शिंदेंचं केसीआर यांच्यावर टीकास्त्र

गोदावरी नदीपात्रात या पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी सात डम्पर वाळू भरलेले आढळून आले. पथक कारवाई करत असताना ट्रकचालक, मालक व इतर असे पथकावर धावून आले आहे. औरंगाबाद पथकाचे इकडे काय काम आहे असे आरडा-ओरडा करून डम्पर चालकाने पथकाच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस कर्मचारी बारवकर यांनी आपल्या जवळून शस्त्रातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर डम्परचालक व इतर आरोपी वाहने सोडून पळून गेली. त्यानंतर पथकाने सातही डम्पर जप्त करून तहसील कार्यालयात आणली आहे.

या प्रकरणी रॉयल्टी निरीक्षक अशोक कुलथे यांच्या फिर्यादीवरून ५० ते ६० जणांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा या कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube