शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय! जेवणासाठी आता कूपन आवश्यक

शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानचा मोठा निर्णय! जेवणासाठी आता कूपन आवश्यक

Shirdi Double Murder Sai trust meal coupon : अहिल्यानगरमधील शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता साईभक्तांना संस्थानमध्ये मिळणाऱ्या जेवणासाठी कूपन घेणे बंधनकारक असणार आहे. शिर्डीमध्ये एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Kalyani family property dispute : 70 हजार कोटींसाठी दोन भाऊ भिडणार; पण मध्ये उभी आहे ‘लाडकी बहीण’!

आतापर्यंत शिर्डीतील साईसंस्थानकडून साई भक्तांना मोफत जेवण दिलं जायचं मात्र यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक मंदिर परिसरात ओळखले जाऊ शकत नव्हते. त्यामुळे साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी गुरुवारी 6 फेब्रुवारीपासून शिर्डी संस्थांच्या प्रसादलयातील जेवणासाठी कुपन बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे शिर्डीतील वाढती गुन्हेगारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Chhtrapati Sambhajinagar : गाडीचा अपघात अन् फिल्मी स्टाईनलं फुटलं बिल्डर पुत्राच्या अपहरणाचं बिंग

दरम्यान साई संस्थानचे (Sai Sansthan) दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले. यापैकी साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आहे.

दिल्लीत बाजी पलटली! आपला धक्का, एक्झिट पोलचा कौल भाजपला

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष घोडे हे मंदिरातील साई मंदिरातील कर्मचारी आहेत. ते ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला. मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

‘संस्थानकडून दिले जाणारे मोफत जेवण बंद करा’, सुजय विखे

शिर्डीच्या प्रसादालयात साईबाबा संस्थानकडून (Saibaba Temple) भक्तांना दिले जाणारे मोफत जेवण बंद करावे. त्यासाठी थोडेफार शुल्क आकारले जावे. हे पैसे मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी खर्च करावे, अशी सूचना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केली. तसेच साईबाबा संस्थान भक्तांच्या देणगीतून दररोज पन्नास हजारांहून अधिक लोकांना मोफत अन्नदान करत आहे. त्यामुळे शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली. महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत जमा झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube