निधी वाटपावरुन नगरचे राजकारण तापले, विखे-थोरात आमनेसामने

निधी वाटपावरुन नगरचे राजकारण तापले, विखे-थोरात आमनेसामने

Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat : गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीच्या आमदारांना निधी दिला जात नाही, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर केला होता. यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. थोरातांच्या आरोपाला विखेंनी प्रत्युत्तर दिले आहे. हे त्यांचे अज्ञान आहे. त्यांनी आकडेवारी कुठून आणली हे माहित नाही. परंतु आपणही आकडेवारी लवकरच जाहीर करू, असे विखेंनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे म्हणाले की राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर निधी वाटपात अन्याय असल्याचा आरोप केला होता मात्र हे त्यांचं अज्ञान आहे त्यांनी ही आकडेवारी कुठून आणली हे माहित नाही. परंतु आपणही आकडेवारी लवकरच जाहीर करू असंही महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

Samrudhi Highway Accident : जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो; पवारांची बोचरी टीका

थोरात म्हणाले होते की भविष्यकाळात चुकीच्या पद्धतीने निधीचे वाटप होऊ नये. महाविकास आघाडीच्या आमदारांवर अन्याय होऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचे थोरात यांनी सांगितले होते. डीपीसी फंड आणि जिल्हा परिषदेचा निधीमध्ये मोठा भेदभाव केला जात आहे. पालकमंत्र्याची जबाबदारी असते की सर्वांना समान न्याय द्यावा. पालकमंत्र्यांनी कसं काम केलं पाहिजे हे मला महिती आहे. पालकमंत्री हा जिल्ह्याचा पालक असतो. त्यात काही चुकीचे घडत असेल तर दुरुस्ती केली पाहिजे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube