गंगामाई साखर कारखान्याच्या आगीत दोन कर्मचारी जखमी

गंगामाई साखर कारखान्याच्या आगीत दोन कर्मचारी जखमी

अहमदगनर : शेवगाव (Shevgaoun)तालुक्यातील गंगामाई शुगर इंडस्ट्रीजच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी आग लागल्याचं समोर आलंय. यावेळी तेथे 32 कर्मचारी कार्यरत होते. त्यातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी असून उर्वरित 30 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गंगामाई साखर कारखान्याचे (Gangamai Sugar Factory)अध्यक्ष रणजीत मुळे (Ranjit Mule)यांनी दिलीय.

सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नजिक बाभळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान मोठी आग लागली. साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने कारखान्याला आग लागली.

आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान

साखर कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे कामगारांनी आपला जीव मुठीत धरून पळ काढला. आग लागलेली घटनेची माहिती दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणांना मिळताच अग्निशमन दलासह रूग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्याच्या घटनेची माहिती दोन्ही तालुक्यातील शासकीय यंत्रणांना मिळताच अग्निशमन दलासह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परंतु, इथेनॉलचे सतत स्फोट होत असल्यामुळे आग भडकत होती. मात्र, अखेर अग्निशमन दलाला रात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.

इथेनॉल टाक्यांचा मोठा आवाज झाल्यानं कर्मचाऱ्यांनी कारखान्यातून पळ काढला, त्यामुळं मोठा अनर्थ टळला. ज्यावेळी इथेनॉलच्या टाक्यांचा स्फोट झाला तेव्हा कारखान्यात 32 कर्मचारी कारखान्यात काम करत होते. स्फोटांचा आवाज आणि आगीचे लोट परिसरात पसरले. त्यामुळं दुर्घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

दरम्यान, या घटनेत दोन कर्मचारी आणि एक टँकर चालक किरकोळ जखमी झाले आहेत. पंडित नागनाथ काकडे, अशोक अण्णासाहेब गायकवाड, आप्पासाहेब माणिक गोरे (टँकर चालक) अशी दुर्घटनेतील जखमींची नावं आहेत. दुर्घटनेतील जखमींवर जवळच्याच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube