उद्धव ठाकरेंनी घेतली एकनिष्ठ शिलेदाराची भेट, ‘अनेक प्रलोभने आली होती पण…’
Uddhav Thackeray met Yashwantrao Gadakh : सुप्रिम कोर्टातील सत्तासंघर्षाने राज्यातील राजकीय (maharshtra politics) वातावरण ढवळून निघाले असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज आपल्या एकनिष्ठ शिलेदाराची भेट घेतली. निमित्त होते ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांच्या वाढदिवसाचे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी सोनईत (Ahmadnagar Politics) येऊन गडाख कुटुंबाची भेट घेत एकत्र जेवणही केले.
या भेटीदरम्यान आपले एकनिष्ठ शिलेदार माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. यशवतंराव गडाखांनी मला लढणारा सैनिक दिला. अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या गडाख कुटुंबाला आपण कदापी विसणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ठाकरे-गडाख कुटुंबियांच्या कौटुंबिक संबंधांना देखील ठाकरेंनी उजाळा दिला.
रश्मी ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे नगरच्या दौऱ्यावर आले होते. आज दुपारी त्यांचे शिर्डीत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सोनई येथे जाऊन गडाख यांची भेट घेतली. घरीच आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी यशवंतराव गडाख यांना दिल्या आणि एकत्र जेवण केलं.
उद्धव ठाकरेंनी घेतली गडाखांची भेट, पाहा फोटो..
यावेळी शंकरराव गडाख म्हणाले की मंत्रिपद द्या किंवा देऊ नका आम्ही तुमच्यासोबत राहू, असा शब्द मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. पुढे आघाडीचे सरकार आले. ठाकरे स्वत: मुख्यमंत्री झाले. आमच्या पाठिंब्याचा मान ठेवून त्यांनी शंकररावांना मंत्रिपद दिलं. दरम्यानच्या काळात आम्हाला अनेक प्रलोभने आली होती. पण आम्ही ठाकरेंची साथ सोडली नाही, असं यशवंतराव गडाख यांनी सांगितलं.
त्यानंतर शनिशिंगणापूर येथे जाऊन शनीला अभिषेक केला आणि दर्शन घेतले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की संकटाच्या काळात लढणारा व खंबीरपणे मागे उभा राहणारा सैनिक आमदार शंकरराव गडाख यांच्या रुपाने मला मिळाला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा व लढण्यास बळ मिळाले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.