Maharashtra Politics :दादा भुसेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी उमेदवार शोधला
नाशिक : मालेगावमधील भाजपचे तरुण नेते डॉ. अद्वय हिरे हे ठाकरे सेने सोबत जाणार आहेत. त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची समर्थकांसह भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या विरोधात डॉ. अद्वय हिरे यांच्या रूपाने उमेदवार शोधला आहे. येत्या काळात हिरे ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.
शिवसेनेच्या फुटीनंतर मंत्री दादा भुसे शिंदे गटासोबत गेले. त्यांची भाजपशी युती झाल्याने डॉ. अद्वय हिरे यांची कोंडी झाली होती. त्यामुळे त्यांनी शेवटी ठाकरे गटाच्या संपर्कात आले.
शिंदे सेना आणि दादा भुसे हे भाजपसोबत आल्याने हिरे यांची कोंडी झाली होती. हिरे हे भुसे यांचे विरोधक म्हणून ओळखले जात होते. मात्र, भुसे हेच भाजपसोबत आले. त्यामुळेच त्यांच्या विरोधाला पक्षातून म्हणावे तसे महत्त्व दिले जात नव्हते. त्यामुळे हिरे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला.
पालकमंत्री दादा भुसे यांनी बोरी-आंबेदारी धरण पाइपलाइन प्रकल्पाची घोषणा केली. परंतु या पाइपलाइनला शेतकऱ्यांन सोबत डॉ. अद्वय हिरे यांचा विरोध होता. हिरे यांनी या प्रकल्पाविरोधात भूमिका घेत डिसेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहित दादा भुसे यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. मात्र, फडणवीस यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे हिरे नाराज होते.
डॉ. अद्वय हिरे यांनी समर्थकांसह मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आगामी काळात ते रितसर ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. पालकमंत्री दादा भुसे यांच्याविरोधात ठाकरे सेना हिरे यांना पुढे करू शकते. हिरे यांच्या पक्षांतराचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होणार आहे.