बापानं मुलाला कॉपी पुरवली, पोलिसांनी धुतला

बापानं मुलाला कॉपी पुरवली, पोलिसांनी धुतला

जळगाव : राज्यात दहावी-बारावीच्या (HSC Exam) परीक्षा सुरु आहेत. कॉपीकेस रोखण्यासाठी शिक्षण बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे. अशात जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रावरचा व्हिडिओ (Jalgaon SSC Exam) सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक पालक आपल्या पाल्याला कॉपी पुरवत असताना पोलिसांनी त्याला धू धू धुतला.

गेल्या आठवडाभरापासून बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत तर दहावीच्या परीक्षा (SSC Exam) नुकत्याच सुरु झाल्या आहेत. राज्य सरकार आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून यंदा कॉपीमुक्त अभियान (Copy Free Campaign) राबविले जाते आहे.

लोकांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेतून हाकललं, महाजनांचा हल्लाबोल

कॉपी केस घडू नये यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून पथकाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. दुसरीकडे नुकताच एक व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यात एका पालकाला परीक्षा केंद्रावरील पोलीसांकडून चोप दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावद येथील परीक्षा केंद्रावरील व्हिडीओ असल्याचे समजते. नूतन ज्ञानमंदिर विद्यालय येथे दहावीच्या परीक्षांसाठीचे केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षा सुरु असताना कॉपी पुरविण्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. मात्र या विद्यालयात परीक्षा सुरु असताना आपल्या पाल्याला कॉपी पुरविण्यासाठी एक पालक परीक्षा केंद्राजवळ दिसून आला.

यावेळी पोलिसांच्या निदर्शनास ही बाब येताच कॉपी पुरवायला जाणाऱ्या एका पाल्याला पोलिसांनी बेदम चोप दिला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडल्यावर पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाल्याला पोलिसांनी पोलिसांच्या काठीनेच चोप दिला आहे. उपस्थित असलेल्या नागरिकांनी याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे सोशल मिडियासह जळगावमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube