राज्यातील राजकारणात पुन्हा गुवाहाटी चर्चेत; ठाकरेंच्या ‘त्या’ खासदारांना दिल्लीतून हलवलं?

Operation Tiger :  सध्या राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी

Operation Tiger

Operation Tiger :  सध्या राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच हे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदारांना दिल्लीतून हलविण्यात आल्याची देखील माहिती समोर येत आहे.

माहितीनुसार, या सर्व खासदारांना उत्तर भारतातील एका राज्यात पाठवल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व खासदार 19 जून रोजी एकनाथ शिंदे (Operation Tiger) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असं देखील बोललं जात आहे.

तर दुसरीकडे 2023 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आमदार फुटले होते तेव्हा त्यांना गुवाहाटीला नेण्यात आले होते मात्र यावेळी खासदारांना आसामला नाही तर दुसऱ्या राज्यात नेण्यात आले आहे. तर ओमराजे निंबाळकर हे पुण्यात दाखल झाले असल्याची देखील माहिती समोर येत आहे.  19 जूनला शिवसेनाचा वर्धापन दिन असून त्यादिवशी या सर्व खासदारांना मुंबईत आणण्यात येणार  आहे.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना धक्का; 6 खासदार फुटले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार त्यांनी ऑपरेशन टायगरअंतर्गत फोडले असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात सुरु आहे. 6 खासदार 19 जूनरोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे 6 पैकी दोन खासदारांनी ठाकरे यांची साथ सोडण्यास नकार दिला असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

याला गद्दारीच म्हणतात.. बंडू जाधवने मतदारांचा अपमान केला; मी पुन्हा परभणी लढणार…-

खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडण्यास नकार दिला असल्याने सध्या ऑपरेशन टायगर थांबलं आहे असं देखील सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले आहे.

follow us