ऑपरेशन टायगर! मेळाव्याला दांडी, वाकचौरेंच्या मनात नेमकं काय?

Opration Tiger राबवले जात असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पक्षाच्या मेळाव्याला अनुपस्थित दिसले.

Letsupp Marathi

Opration Tiger Thackerays MP Bhausaheb Wakchoure absent UBT get together : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. यातच नुकताच शिर्डी येथे ठाकरेंच्या सेनेचा मेळावा पार पडला. मात्र या मेळाव्याला खुद्द ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अनुपस्थित दिसले. यातच वाकचौरे यांच्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्याची भेटीगाठी पाहता ते शिंदेसेनेच्या वाटेवर आहे कि काय अशा चर्चा देखील रंगल्या आहे. यामुळे येणाऱ्या काळात ऑपरेशन टायगर हे नगर जिल्ह्यात यशस्वी ठरणार कि काय हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

ज्यांनी माफ केलं त्यांच्याशी इमान राखा…रूपवतेंचा हल्लाबोल

शिर्डी लोकसभेत पुन्हा गद्दारी

ठाकरे गटाचे राज्याचे नेते शिर्डीत पक्ष मेळाव्यासाठी उपस्थित असतात मात्र खासदार साहेब (भाऊसाहेब वाकचौरे) मात्र गायब …मतदारांशी निवडणुकीत केलेल्या घोषणाशी किती प्रामाणिक राहून काम करत आहात हा प्रश्न तर अनुत्तरित आहे. पण ज्या पक्षाने नेतृत्वाने मोठ्या मनाने माफ केलं त्यांच्याशी तरी इमान राखा अशा शब्दात वंचित पक्षाच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

वाकचौरेंनी विरोधी गटात जाऊ नये…खैरे

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उबाठाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे गेल्या काही दिवसांपासून विरोधी गटाच्या संपर्कात म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. यातच मंगळवारी शिर्डीत शिवसेनेच्या महत्त्वाच्या मेळाव्यातील त्यांच्या अनुपस्थितीमुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. यातच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाकचौरे यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. वाकचौरे यांनी विरोधी गटात जाऊ नये, असा सल्ला देताना चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्याबद्दलची खंतही व्यक्त केली.

ऑपरेशन टायगर…वाकचौरे शिंदेंच्या गळाला लागणार का?

सध्या शिर्डीत ऑपरेशन टायगर यशस्वी होत असल्याच्या सूर आहे. यातच खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या भूमिकेकडं विशेष लक्ष दिलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून खासदार झाल्यानंतरही वाकचौरे यांनी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडं पाठ फिरवली असल्याची भावना काही शिवसैनिकांमध्ये सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे येणाऱ्या काळात ते काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

 

 

follow us