- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राहुरीतील नव्या बसस्थानकाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा…आमदार तनपुरेंचा पाठपुरावा
Mla Prajakta Tanpure : राहुरी शहरातील बस स्थानकाची दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र या बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे(Prajakt Tanpure) यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नुकतेच तनपुरे यांनी या बसस्थानकाच्या नवीन इमारती संदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या उप महाव्यवस्थापिका (स्थापत्य) […]
-
नांदेड, संभाजीनगर घटनेनंतर सरकारला आली जाग; औषधे खरेदी करण्याचे दिले अधिकार
नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूंचं तांडव पाहायला मिळालं होतं. यामध्ये अनेक नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यभरातून संतापाची भावना व्यक्त होत असतानाच आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर 100 टक्के औषधं खरेदी कण्याचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. […]
-
‘भाजपाच्या मेहेरबानीने पालकमंत्रिपद, चौकटीत राहून काम करा’; भाजप नेत्याचा मुश्रीफांना इशारा
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण (Kolhapur Politics) म्हटलं की समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यातील राजकीय संघर्ष कोल्हापुरातील जनतेसाठी नवा नाही. आताही मुश्रीफ भाजपबरोबर आले, कोल्हापूरचं पालकमंत्रीपदही मिळवलं तरी देखील दोन्ही नेत्यांतील संघर्ष कमी झाला नाही. आताही दोघांतील संघर्षात वाढ होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हसन मुश्रीफ यांना भाजपाच्या मेहेरबानीमुळे पालकमंत्रीपद […]
-
नांदेड : 46 मृत्यू, डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा अन् केंद्रीय मंत्र्यांची रुग्णालयाला क्लीनचिट!
नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 46 वर गेली आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषध टंचाईमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशात आता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात […]
-
‘राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्या अन्’.. फडणवीसांनी फोडलं मोठं गुपित!
Sharad Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) नेमकं काय घडलं होतं याचं उत्तर फडणवीस यांनी दिलं. फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना स्पष्ट शब्दांत उत्तरे दिली. राष्ट्रवादी […]
-
Mahavikas Aaghadi : जागा वाटपाचा घोळ 9 नेते सोडविणार; चव्हाण, राऊत, पाटलांच्या खांद्यावर धुरा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात जागावाटपच्या चर्चांना वेग आला आहे. अशात आता महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठीच्या जागा वाटपाचा घोळ सोडविण्यासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तीन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन सदस्य असणार आहेत. हेच नऊ जण महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित […]









