- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपचा धनराज विसपुतेंना पाठिंबा?
नाशिक : नाशिक पदवीधर मतदासंघात दररोज एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आज नाशिक मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केलेले धनराज विसपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अपक्ष उमदेवार धनराज विसपुते यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन भाजपकडून आपल्याला पाठिंबा मिळावा, अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप भाजपकडून कोणत्याही उमदेवाराला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा […]
-
कर्नाटकच्या तुरुंगातून मंत्री गडकरींना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली हकिकत
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आलेल्या धमकीप्रकरणी अखेर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा छडा पोलिसांनी लावल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यामांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी या धमकी प्रकरणाची हकिकत मांडली. ते म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांना आलेली धमकी आम्ही गांभीर्याने घेतली असून त्या कॉलचा शोध घेण्यात आला. धमकीप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा […]
-
फडणवीसांच्या कार्यक्रमात पुन्हा मुंडे भगिनींची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चा
बीड : पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा पार पडला. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच मुंडे कुटुंबियांची अनुपस्थिती पहायला मिळाली. मागील 15 दिवसांमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा दुसरा बीड जिल्हा दौरा आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या दोघी बहिणींनी पाठ फिरवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा […]
-
खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; वेळीच दाखवलं प्रसंगावधान…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला दीप प्रज्वलन करत असताना अचानक आग लागल्याची घटना आज ( ता. १५ जानेवारी) पुण्यात घडली आहे. दरम्यान, साडीने पेट घेतल्यावर तत्काळ आग विझवण्यात आली. यामध्ये सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.मात्र, सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार सुळे या […]
-
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदरवर अन्याय? सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधान
पुणे : येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षे या पैलवानानं पटकावलीय. अखेरच्या सामन्यात शिवराज राक्षेनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटातच चितपट करुन महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलंय. पण दुसरीकडं सोशल मीडियावर एक वेगळ्याच चर्चांना उधान आलंय. पैलवान सिकंदर शेखवर अन्याय […]
-
मंत्री गडकरींच्या कार्यालयात आलेला धमकीचा कॉल थेट बेळगावच्या तुरुंगातून…
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आलीय. हा कॉल एका सराईत गँगस्टरनं केला आहे. सध्या तो बेळगाव तुरुंगामध्ये कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडील फोनच्या माध्यमातून त्यानं कॉल केल्याचं समोर आलंय. त्यामुळं तुरुंग प्रशासनाचा अनागोंदी कारभार देखील यानिमित्तानं समोर आलाय. तुरुंगात कैद्याकडं मोबाईल फोन कसा काय […]









