- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Prakash Ambedkar : राहुल गांधींचा विचार बेसलेस, सावरकर त्यांना कळलेच नाही!
पुणे : स्वतंत्र्यावीर सावरकर हे सर्वांचे हिरो आहेत. याबद्दल दुमत नाही. त्यांनी अंदमानमध्ये यातना भोगल्या हेही खरे आहे. मात्र, सावरकरांच्या हिंदू महासभेने त्याकाळी सातारा, सांगली, कोल्हापूर, कारवार, निपाणी या परिसरातील क्रांतीकारकांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. हे विसरून चालणार नाही. नेमके हेच काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना माहिती नाही. त्यांनी आधीचे सावरकर पकडले नाही. तर केवळ […]
-
Prakash Ambedkar : शरद पवार आजही भाजपसोबत… असे का म्हणाले ?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचं सख्य जगजाहीर आहे. मात्र, शरद पवार यांच्या या भूमेकेमुळे महाविकास आघाडीला कमी आणि भारतीय जनता पार्टीला जास्त फायदा होत आहे. त्याला कारणीभूत शरद पवार यांची भूमिका आहे. कारण ते हात दाखवतात डावीकडे अन जातात उजवीकडे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा […]
-
Shyam Manav : श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी… पुण्यात का गुन्हा दाखल?
पुणे : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मानव यांचा मुलगा हिंजवडी परिसरात असताना हा धमकीचा मेसेज आल्याने भारतीय दंड विधान संहिता आणि आयटी कायद्या अंतर्गत सूर्यप्रताप नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागेश्वर […]
-
Aurangabad : विद्यापीठ, कॉलेज कर्मचारी जाणार बेमुदत संपावर; परीक्षांवरही बहिष्कार
औरंगाबाद : महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी येत्या 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची (Strike)हाक दिली आहे. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Higher and Technical Education)स्तरावर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. बऱ्याचदा निवेदनं, भेटी, बैठका व आंदोलन होऊन देखील शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचं […]
-
महाराष्ट्रातून झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार; पुरस्कारांमध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून ज्येष्ठ तबला वादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर राजकीय नेत्यांमध्ये मुलायम सिंग यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 15 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह इतर विविध […]
-
तांबेंसाठी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
अहमदनगर : काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित केलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यावर अन्याय झाला, असे सांगत अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे(Balasaheb Salunkhe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ते कट्टर समर्थक समजले जातात. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांत दोन गट पडल्याचे […]








