- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बोम्मईंना जशास तसं उत्तर द्या, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर संतापले…
नागपूर : महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुन्हा एकदा केला. याला उत्तर देताना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. माझा मुद्दा हाच आहे की आपल्याही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारची वक्तव्य केली पाहिजेत. त्यातून सीमाभागातील मराठी […]
-
राज्यात थंडीचा कडाका वाढला, काही दिवस पारा आणखी घसरणार
मुंबई : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसतोय. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. याच शेती पिकांवर परिणाम होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा आणखीच घसरलाय. त्यामुळं थंडीचा कडाका वाढल्याचं पाहायला मिळतंय. गारठा वाढल्यामुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. आजपासून (दि. 21) संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेच्या किमान तापमानात घट होवून ते […]
-
पुण्यात 10 ते 14 जानेवारी दरम्यान रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा काही दिवसांपूर्वी वादात सापडली होती. कुस्तीचा आखाडा अहमदनगरमध्ये होणार की पुण्यात यावरुन पैलवानांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यावर शरद पवार आणि ब्रिजभूषण सिंह यांनी अखेर तोडगा काढला होता. आता 11 ते 14 जानेवारीदरम्यान पुण्यात ही स्पर्धा रंगणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार 10 […]
-
दलबदलूचे राजकारण नाकारले; सर्वाधिक ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा – जयंत पाटील
नागपूर : महाराष्ट्रात अधिकृत घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १ हजार ३०० ग्रामपंचायतीवर आणि महाविकास आघाडीचे इतर दोन घटक पक्ष लक्षात घेता २ हजार ६५१ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. शिवसेना आणि भाजप यांच्या मिळून साधारणपणे २ हजार २०० ग्रामपंचायतीवर झेंडा फडकला […]
-
कोल्हापुरातील चंदगडमध्ये ‘नोटा’ला बहुमत
कोल्हापूर : जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कागणी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान मिळालं. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शितल अशोक कोरे यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. यावर आता अनेकांनी आक्षेप घेतला आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले कोणीही पसंत नसल्यास मतदारांना ‘नोटा’ म्हणजे वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय देण्यात आला आहे. पण जर या नोटालाच सर्वाधिक […]
-
बायकोला सरपंच करून थेट तीन वर्षांनंतर दाढी करणार हा पठ्ठ्या !
सोलापूरः निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर अनेक जण नवस करतात. काही जण वेगळे निर्धार करतात. आपला नेता विजयी होईपर्यंत चप्पल घालणार, दाढी करणार नाही, असे अनेक जण आहेत. तसाच निर्धार पंढरपूरमधील एकाने केलाय. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची पत्नी विजयी झाली आहे. त्यामुळे तो आता तीन वर्षानंतर दाढी, डोक्याचे केस काढणार आहे. पंढरपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला […]









