- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
हिंद केसरी स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्रातील पैलवानांवर होणार कारवाई
पुणे : तेलंगणात होणाऱ्या 51 व्या हिंद केसरी स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवानांना खेळता येणार नाही. तरीही महाराष्ट्रातील पैलवान किंवा पंच सहभागी झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अस्थाई समितीनं दिला आहे. पण महाराष्ट्र केसरी खेळल्या जाणाऱ्या पैलवानांवर कारवाई केली जाणार नाही. याबाबत समितीनं एक पत्र काढून जाहीर केलंय. भारतीय शैली कुस्ती महासंघानं दि. 5 ते 8 जानेवारी […]
-
सत्यजित तांबे यांनी सांगितली २०२४ च्या निवडणुकीची तयारी!
अहमदनगर : राज्यात 288 विधानसभेचे मतदारसंघ असून त्यापैकी कोणत्याही मतदारसंघातून संधी मिळणार तेथून मी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं युवक कॉंग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लेट्सअपशी बोलताना सांगितलं आहे.लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय. ते म्हणाले, मला लोकसभेत, आणि विधानपरिषदेत काम करण्यास रस नसून विधानसभेतच काम करण्यात रस आहे. माझ्या दृष्टीने राज्य […]
-
सीमावादावर आजचा कर्नाटक सरकार विरोधातला संपूर्ण ठराव वाचा
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला संपूर्ण ठराव “नोव्हेंबर १९५६ […]
-
कर्नाटकविरोधाचा ठराव एकमताने मंजूर; सीमाभागातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र्र सरकार
नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून गाजत असलेल्या सीमाप्रश्नी आज कर्नाटक सरकारविरोधातील ठराव महाराष्ट्र विधिमंडळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. सीमा भागातील ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे, असे ठरावात उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला. कर्नाटकातील मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न […]
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील स्मृति मंदिरात आज भाजपच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्यांकडून अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी महत्वाचे वक्तव्य केले आहे. नागपुरातील स्मृती मंदिरमध्ये सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली करण्यासाठी अनेक मंत्री, आमदार दाखल झाले आहेत. आज […]
-
समृद्धीसाठी 4 एकर शेती देत त्याबदल्यात 20 एकर घेतली
नागपूर : महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आशा काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘रामगिरी’वर खास स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला व आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन 11 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते […]








