पंजाबराव डख यांना पावसाचा फटका; 17 एकरातलं सोयाबीन वाहून गेलं…
Punjabrao Dakh : राज्यात पावसाच्या सरी जोरदार कोसळत आहेत. मराठवाड्यासह विदर्भात पावसाने हाहाकार घातलायं. अशातच आता हवामानाचा अंदाज सांगणारे हवामान तज्ञ पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांचं 17 एकरमधील सोयाबीन वाहुन गेलंय. या पावसामुळे डख यांना चांगलाच फटका बसलायं.
मराठावाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी पिके नाही तर मातीतही वाहुन गेलीयं. धुव्वादार पावसामुळे शेतातील साचलेले पाणी, खंगाळलेल्या जमीनी, आडव्या पडलेली नवतीची पिके फुटलेल्या बांधामुळे शेतकऱ्यांचे मोठे नूकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला असल्याची परिस्थिती आहे.
प्रदेशाध्यक्ष रिपून बोरांनी सोडली ममता बॅनर्जींची साथ, कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार?
मागील अनेक वर्षांपासून पंजाबराव डख हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना अंदाज सांगत असतात. मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात कधी पाऊस कोसळणार, कोणत्या वेळी कोणतं पिके घ्यावीत याबाबत डख सांगत असतात. मात्र, परभणीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पंजाबराव डख यांच्या शेतातील पीक वाहून गेले आहे.
दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना अर्थिक स्वरुपात मदत करावी, अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून केली जातेयं. विदर्भात पाच ते सहा दिवसांपासून उघडीप दिली आहे. परंतु अधूनमधून सरी बरसत आहेत. यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोलीत पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. बुलडाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात हलका पाऊस झाला आहे. काही भागातही बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ओढ्या, नाल्यातील पाणीपातळीत काहीशी वाढ झाली.