पंकजा मुंडेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन

WhatsApp Image 2022 12 23 At 12.28.17 PM

अहमदनगर : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शिर्डी येथे साईबाबांचं समाधीच दर्शन घेतले आहे. यावेळी पंकजा मुंडे यांचा सत्कार करण्यात आला आहे.

मुंडे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर जागतिक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारण हा विषय सर्वत्र असतो. प्रत्येक क्षेत्रात राजकारण चालते. मात्र ते सकारात्मक केले पाहिजे. नुकत्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असून आमच्या जिल्ह्यात बहुतांशी ग्रामपंचायतीवर आमची सत्ता आली आहे.

जनतेतून सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. कोणताही सरपंच किंवा सदस्य असला तरी त्यास संपूर्ण माहिती नसते. महिलांबरोबर पुरुष सरपंचांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री असताना शिर्डीमध्येच राज्यातील सरपंचांचा मेळावा घेऊन प्रशिक्षण दिले होते.

अनेक ठिकाणी आरक्षणामुळे महिला सरपंच झाल्या असून त्यांना घरातील पुरुष मंडळींनी मार्गदर्शन करावे. पण त्यांना स्वतः कामे करून द्यावीत. अनेक इंजिनिअर व सुशिक्षित तरुण व महिला या परत आपल्या गावात, ग्रामीण भागात येऊन गावच्या विकासासाठी निवडणूक लढवून सरपंच होत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी संस्‍थानचे प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, साईराज गायकवाड, अशोक गायके ,प्रवीण घुगे, सोमराज कावळे, सोनू ठोंबरे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

follow us