Ajit Pawar : जे पोटात तेच बाळासाहेबांच्या ओठात असायचं, बाळासाहेबांच्या स्वभावाबद्दल पवारांनी सांगितलं
मुंबई : जे पोटात तेच बाळासाहेबांच्या ओठात असायचं, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी केलंय. यावेळी त्यांनी बाळासाहेब कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता? याबद्दल भाष्य केलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे कार्य, विचार देशाला माहित आहे. ते राजकारणी नव्हते खुल्या पुस्तकासारखं त्यांच जीवन होतं. जे पोटात तेच त्यांच्या ओठात असायचं, आजच्या जयंतीनिमित्त हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.
तसेच आज बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) जे करुन दाखवलंय तेच अगदी जसंच्या तसंच नव्या पिढीला दाखवण्यासाठी ठेवलं पाहिजे, यामध्ये कुठल्याही प्रकारची मोडतोड होता, कामा नये असा इशाराही त्यांनी कार्यक्रमात बोलताना दिला आहे.
शिवसेना प्रमुख या पदाव्यतिरिक्त बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) ओळख अपूर्ण आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) तैलचित्रावर शिवसेना प्रमुख हिंदु ह्रदयसम्राट असं नाव असायला हवं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय. तसेच बाळासाहेबांबद्दल (Balasaheb Thackeray) सर्वच समाजातील, सर्वच धर्माच्या लोकांना आस्था होती. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन अजित पवार यांनी केलंय.
यावेळी अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या राजकारणाबद्दल थोडक्यात स्पष्ट केलंय. बाळासाहेबांनी 1972-73 मध्ये रा.सु. गवई यांच्यासोबत आरपीआशी युती केली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणुक लढवली होती. त्यासोबतच त्यांनी मुस्लिम लीगचाही पाठिंबा घेतला होता. बाळासाहेब मुस्लिमांच्या विरोधात नव्हते, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
1976-78 च्या काळात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी राजकारणासाठी अनेक पक्षांशी युती केल्यांच त्यांनी सांगितलंय. दलित पॅंथरच्या माध्यमातून त्यांनी नामदेवराव ढसाळांसोबतही युती केली होती. त्यासोबत रामदास आठवलेसोंबतही त्यांची युती होती. तसेच आणीबाणीच्या काळात त्यांनी कॉंग्रेसला देखील पाठिंबा दिला असल्याचं स्पष्ट केलंय.
दरम्यान, बाळासाहेब सर्वांना आपलेसे वाटायचे, त्यांची सर्वच क्षेत्रातील लोकांशी गाढ मैत्री होती. ते केवळ शिवसेनाप्रमुख नव्हते तर नेतृत्वसम्राट, कलासम्राट, पत्रसम्राटही होते, असं म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.
तैलचित्र अनावरण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नरहरी झिरवाळ, विधान परिषद उपसभापती निलम गोर्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबादास दानवे यांच्यासह भाजप-शिंदे गटाचे खासदार, आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते.