धक्कादायक! तुम्ही खाताय ते बदाम खरे आहेत? शिर्डीत पूजा साहित्यात आढळले प्लॅस्टिकचे बदाम
Plastic almonds in Shirdi अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Plastic almonds found in worship offerings in Shirdi : आजकाल अनेक अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या बातम्या आपण वाचतो. मात्र त्याहूनही धक्कादाक म्हणजे सोशल मिडीयवर चक्क खाण्याचे पदार्थ प्लॅस्टिकचे असल्याचे दावे करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यावर किती विश्वास ठेवायचा हा बाग वेगळा मात्र आता अहिल्यानगर जिल्ह्यातील साईबाबांच्या शिर्डीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे शिर्डीतील एका पूजा साहित्याच्या दुकानात चक्क प्लास्टिकचे बदाम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
‘जनता दरबार’ सुरु असताना अचानक बिघडली धनंजय मुंडेंची प्रकृती; रुग्णालयात दाखल
शिर्डी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पूजा साहित्यासाठी वापरले जाणारे बदाम हे खरे नसून प्लास्टिकचे असल्याचे आढळून आल्याचे सांगण्यात आले. यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली. भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित पूजा साहित्यात अशा प्रकारे बनावट वस्तूंची विक्री होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पूजा साहित्य खरेदी करताना भाविकांनीही सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
ओम नमस्ते गणपतये… च्या जयघोषाने दुमदुमला परिसर, दगडूशेठ गणपती समोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण
या प्रकारानंतर शिर्डी नगरपालिकेने मंदिर परिसरासह शहरातील पूजा साहित्य विक्री करणाऱ्या अन्य दुकानांचीही तपासणी सुरू केली आहे. भाविकांची फसवणूक करून बनावट अथवा भेसळयुक्त पूजा साहित्य विकणाऱ्या दुकानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे.