मुलांच्या जीवाशी ‘खेळ’, कफ सरफ बनविणाऱ्या कंपन्या रडारवर!

मुलांच्या जीवाशी ‘खेळ’, कफ सरफ बनविणाऱ्या कंपन्या रडारवर!

मुंबई : भारतातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरफमुळे 66 मुलांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कफ सिरफ तयार करणाऱ्या 17 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन संजय राठोड यांनी दिलीय.

जागतिक आरोग्य संघटनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर एकूण 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 17 दोषी कंपन्या तर 4 कंपन्यांचे उत्पादन बंद आणि 6 कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

देशातून निर्यात झालेल्या सदोष कफ सिरफमध्ये हानीकारक घटकद्रव्ये आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून निदर्शनास आणून दिली आहे. राज्यातील २०० औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणारी २००० पेक्षा अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी, २०२३ मध्ये आढळून आले.

गृहमंत्री फडणवीसच जबाबदार.. देशपांडेंवर हल्ला म्हणजे कायदा सुव्यस्थेचे बारा; अंधारेंचा हल्लाबोल

त्यामुळे राज्यातील औषध उत्पादकांची सखोल चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करून कारवाई करण्याची मागणी करीत आमदार आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थितीत केली होती.

Maharashtra Budget : विरोधकांनी केला सभात्याग; बालविकासमंत्र्यांच्या उत्तराने वाढला वाद

जागतिक आरोग्य संघटनेने गांबियामधील ६६ मुलांच्या मृत्युवरून ऑक्टोबर २०२२ मध्ये अलर्ट जारी केला होता. त्याअनुषंगे अन्न व औषध प्रशासनाच्या ७ ऑक्टोबर 22 च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील लिक्वीड ओरल उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची, अन्न व औषध प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटना यांनी गांबियामधील मुलांच्या मृत्युवरून जारी केलेल्या बातमीच्या अनुषंगाने तपासणी मोहीम हाती घेतली होती.

यामध्ये 84 कंपन्यांची तपासणी करण्यात आली. ज्या उत्पादकाकडे स्थिरता चाचणीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत अशा एकूण 27 कंपन्या आढळून आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येत असून 2 हजार परवाना धारकांना कारणे दाखवा तर 424 परवाने रद्द तर 56 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संजय राठोड यांनी दिलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube