‘इंडिया’ला शह देण्यासाठी महायुतीच्या हालचाली; ‘वर्षा’वर महत्वपूर्ण बैठक, लोकसभेसाठी केला संकल्प

‘इंडिया’ला शह देण्यासाठी महायुतीच्या हालचाली; ‘वर्षा’वर महत्वपूर्ण बैठक, लोकसभेसाठी केला संकल्प

मुंबईत सुरू असलेल्या भारत आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. य़ा बैठकीत विरोधकांची रणनिती ठरत असतानाच राज्यातील महायुतीची काल रात्री वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत एकूण तीन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये दोन ठराव अभिनंदनाचे तर एक ठराव संकल्पाचा होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून एकदिलाने काम करणार असल्याचा संकल्प महायुतीच्या
सर्व घटक पक्षांनी केला आहे. या बैठकीला महायुतीतल्या सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

BCCI Media Rights : BCCI ची चांदी; Viacom-18 ने घेतले 5,963 कोटीत मीडियाचे अधिकार

बैठकीत महायुतीच्या सर्वच घटकपक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व जागा जिंकून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात दणदणीत बहुमताचे सरकार स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे.

पंतप्रधानपदासाठी भाजपाकडे दुसरा चेहरा कोण? ठाकरेंच्या प्रश्नावर शिंदेंचं सडेतोड उत्तर

संकल्प केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, रासपचे महादेव जानकर, यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विजयासाठी आम्ही कटिबद्ध असून एकदिलाने काम करणार असल्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आरपीआयचे रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, बच्चू कडू, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनय कोरे, हितेंद्र ठाकूर, जोगेंद्र कवाडे आदी नेते, मंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित होते.

Megha Dhade: बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक’ पदी नियुक्ती; म्हणाली…

जपानच्या कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट जाहीर केल्याबद्दल यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ, भारताचे सर्व नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

दरम्यान, एकीकडे देशात भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोर लावता जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडियाच्या बैठकांचं सत्र सुरुच आहे. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया पक्षाच्या जागावाटप आणि चिन्हावर चर्चा झाली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेतून काँग्रेस नेते राहुल गांधींनी उद्योजक गौतमी अदानी आणि पंतप्रधान मोदींवर टीकेची तोफ डागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube