छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधन विक्री, तिघांना अटक
शहारतल्या विविध भागामध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधन साहित्याची खुलेआम विक्री होत असल्याचं समोर आलं होतं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तान (Pakistan) ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातल्या विविध ठिकाणी ही विक्री सुरु होती. या अवैध विक्रिची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत चार दुकानांवर धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी तीन जणांना अटकही केली आहे. डीसीपी रत्नाकर नवले यांनी सांगितलं की, त्यांना या प्रकरणाची माहिती गोपनीय सूत्रांनी माहिती दिली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांना शहरातील काही दुकानांत पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने विक्री केली जात असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. क्राइम ब्रांचच्या टीमने कारवाई करत शहरातल्या 4 दुकांनावर धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात ‘मेड इन पाकिस्तान’च्या सौंदर्य प्रसाधनांचा साठा मिळाला आहे. यामध्ये ग्लो, फेस कोल्ड, गोल्ड ब्यूटी क्रीम अशा नावांचे काही प्रॉडक्ट मिळाले आहेत. याशिवाय सर्व प्रकारचे कॉस्मेटीक साहित्यही त्यामध्ये सापडून आले आहे. या सर्व साहित्याला पोलिसांनी जप्त केले आहे.
अशोक खरात प्रकरणात सीए ललित पोफळेला वाचवण्याचा प्रयत्न?
त्याचबरोबर याप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत ही अवैध विक्री करणाऱ्या तीन आरोंपीवर कारवाई केली आहे. त्यांना अटकही केली आहे. यासंबंधी सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींवर व्यावसाय अधिनियम कलम ३, भारतीय न्याय संहिता कलम २२३ आणि ड्रग्स आणि कॉस्मेटीक अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी यासंबंधीची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलीस अधिक्षकांना दिल्याची माहितीही समोर आली आहे. शहारतल्या विविध भागामध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधन साहित्याची खुलेआम विक्री होत असल्याचं समोर आलं होतं.
हे सगळं होत असताना पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत, पोलिसांनी जर कारवाई केली नाही, तर मनसे स्वतः या विक्रेत्यांवर मनसे स्टाईल कारवाई करेन, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मनसेच्या या इशाऱ्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान, मनसेने या विक्रेत्यांची दुकानं पेटवून देऊ, अशीही धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी ४८ तासांच्या आत ही मोठी कारवाई करत संबंधित दुकानांवर छापेमारी केली आणि तीन जणांना याप्रकरणी अटकही केली आहे. त्यांच्याकडील अवैध सामानही जप्त केलं आहे.