खासदार संजय पाटलांची खरी सही कोणती ? राजकारण तापले

खासदार संजय पाटलांची खरी सही कोणती ? राजकारण तापले

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून सांगलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चांगलीच श्रेयवादाची लढाई जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाकडून आमच्याच प्रयत्नांतून या पंचायत समितीच्या नवीन इमारती निधी मंजूर झाला आहे. असा दावा करत आहेत. दरम्यान भाजपचे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यावर आरोप केले होते.

त्यानंतर भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने देखील पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील यांनी खळबळजनक आरोरप केला होता की, पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामावरील स्थगिती उठवण्याच्या पत्रावरील खासदार संजय पाटील यांची सही बोगस आहे.

Ajit Pawar यांची केंद्रांवर टीका : मूठभर उद्योगपतींचे ११ लाख कोटी माफ केले… पण शेतकऱ्यांना मदत नाही केली!

त्यावर राष्ट्रवादीला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने पुन्हा पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या युवा नेत्यांनी म्हणजे रोहित पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना पुढे करणं बंद कराव आणि खंडपीठाच्या आदेशाने स्थगिती उठवलेली सिद्ध करून दाखवाव. भाजपने राष्ट्रवादीला दिलं आहे. तसेच पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामावरील स्थगिती उठवण्याच्या पत्रावरील खासदार संजय पाटील यांची सही बोगस नाही तर खरी आहे. याचं स्वतः खासदारांचं पत्र भाजपने दिलं. त्यामुळे आता खासदार संजय पाटीलांची खरी सही कोणती ? यावरून सांगलीमध्ये राजकारण तापले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube