आता आपली भेट होणार नाही…; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला अजितदादांशी शेवटचा संवाद

Praful Patel On Ajit Pawar : अजित पवारांचा आवाज आजही कानात घुमत राहतो आणि त्यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर येतो असं म्हणत राष्ट्रवादी

  • Written By: Published:
Praful Patel On Ajit Pawar

Praful Patel On Ajit Pawar : अजित पवारांचा आवाज आजही कानात घुमत राहतो आणि त्यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर येतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रफुल्ल पटेल बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी पुढील सात- आठ दिवस दौऱ्यावर असणार असून आता आपली भेट होणार नाही असं अजित पवार मला म्हणाले होते. अजित पवार यांचा चेहरा आजही डोळ्यासमोर येतो. त्यांचा आवाज आजही कानात घुमत राहतो पण नियतीने ठरवलं ते आपल्याला स्वीकारावंच लागतो असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

दादा असे अचानक सोडून जातील असं वाटलं नव्हतं. दादा आणि मी एकत्रच राजकारणात आलो. दोन्ही एकत्र खासदार झालो मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची एन्ट्री झाली. मी आणि अजितदादा 1991 पासून एकत्र होते. आम्ही केवळ राजकारणात नाही तर वैयक्तिक आयुष्यातही सुखदु:खात साथी होतो. दादांनी आयुष्यात अनेक चढउतार मोठ्या हिंमतीने पार केले. आम्हाला एक वेगळा निर्णय घ्यावा लागला तेव्हाही आम्ही एकत्र होते मात्र आता पक्ष पुढे जाण्यासाठी सज्ज असताना दादा सोडून गेले असं या कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणाले. तसेच अजित पवार यांच्या काम करण्याची पद्धत तशी पुढे सुरु ठेवणार असल्याची ग्वाही देखील प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार यांचा देखील उल्लेख करत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह होता. पवार परिवार 3 दिवसांचा शोक करतात आणि कामाला लागतात.सुनेत्रा पवारांकडे आपल्याला नेतृत्व सोपवायचं आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला प्रगतीपथावर न्यायचंय आहे आणि हीच अजित पवारांना खरी श्रद्धाजंली असेल असं या कार्यक्रमात बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नााही असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ट्रम्पचा टॅरिफवर ‘यू-टर्न’ अन् अचानक अमेरिकेने भारताबद्दल बदलली भूमिका; नेमकं कारण काय?

28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते मात्र विमान अपघातात त्यांचं निधन झालं.

follow us