मामा आणि शरद पवारांना भेटायची हिंमत नाही; भाजप प्रवेशापूर्वी तनपुरेंची प्रतिक्रिया
Prajkt Tanpure यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापुर्वी मामा जयंत पाटील आणि शरद पवारांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Prajkt Tanpure Recation before join BJP don’t have courage to meet Jayant Patil and Sharad Pawar : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून राहुरीचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात दुपारी तीन वाजता हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. त्यानंतर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीकडून त्यांची उमेदवारीही जाहीर होऊ शकते. दरम्यान या पक्ष प्रवेशापुर्वी तरपुरेंनी मामा जयंत पाटील आणि शरद पवारांच्या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले प्राजक्त तनपुरे?
मी आज मोठा निर्णय घेत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मी राष्ट्रवादीसोबत जोडलेलो आहे. हा निर्णय माझ्या एकट्याचा नसून सध्याच्या परिस्थितीनुसार मी ज्यांच्या जीवावर राजकारण केलं. त्या कार्यकर्त्यांसाठी मी हा निर्णय घेतला आहे. कारण माझ्या कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे की, भाजप प्रवेशानेच त्यांच्या भागाला निधी मिळेल. त्यामुळे मला माझ्या कार्यकर्त्यांचं राजकारण देखील पाहायचं आहे.
पक्षासाठी निधी द्या अन्यथा… पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्री अन् आमदारांना स्पष्ट सूचना
तसेच जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा मी पक्षासोबत राहिलो. मी तेव्हा विचारांवर ठाम रोहिलो. मात्र मी आज भाजपमध्ये प्रवेश करतोय. माझे मामा जयंत पाटील आणि शरद पवार यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही. मला आता शब्द नाहीत, त्यामुळे बोलणं देखील अवघड झालं आहे.