सोयीच्या राजकारणासाठी स्त्रियांना का पुढे करता? प्रकाश महाजनांचा सवाल…

सोयीच्या राजकारणासाठी स्त्रियांना का पुढे करता? प्रकाश महाजनांचा सवाल…

मुंबई : सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणाच्या परिस्थितीवर मनसे नेते प्रकाश महाजनांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. सोयीच्या राजकारणासाठी स्त्रियांना पुढे का करताय? असा सवाल राज्यात सुरु राजकीय परिस्थितीवर प्रकाश महाजनांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पुन्हा राहुल कुल यांचे नाव घेतले…

महाजन म्हणाले, सध्या सत्तेलाच साध्य समजण्यात येत आहे. त्यामुळे सत्ता गेल्यानंतर माणसाची निराशा आपल्या वक्तव्यातून बाहेर पडत आहे. जून्या काळी सत्ता असली काही नसली काय फरक पडत नव्हता, असंही ते म्हणाले आहेत.

ब्रम्हनाथ यात्रेत गाडी-बगाडाला भिषण अपघात, एक जण गंभीर

तसेच सत्ता नाही आली म्हणून देशातील अनेक दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयींसारखे नेते निराश न होता दुसऱ्याच क्षणी कामाला लागल्याचं पाहायला मिळालंय. सध्या एकेकाळचे सहकारी एकमेकांविरोधात खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. हे पाहुन आपण कुठं आलोयं हे समजतच नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

पियूष गोयल म्हणतात, देशातील महागाई आटोक्यात; जाहीर केली वस्तूंच्या दरांची यादी

ठाण्यात एका महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. जर खरंच मारहाण झाली असेल तर ते निषेधार्ह आहे. महिला कार्यकर्त्यांना असं पुढे करुन सोयीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

तर एकीकडे अनिल देशमुखांच्या नातीची ईडीकडून चौकशी केली जाते, तत्कालीन सरकारच्या काळात कंगना राणावतला त्रास दिला जात असतानाही सत्ताधारी नेते गप्प बसतात हे काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात? असा सवालही त्यांनी केलाय.

दरम्यान, राजकीय नेत्यांनी सत्तेला जनतेची सेवा करण्याचं साधन समजलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube