पंतप्रधान मोदी, शाहांनाही भिडेंचं वक्तव्य.., मंत्री छगन भुजबळांचं मोठं विधान
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महात्मा गांधींबद्दलचं भिडेंचं विधान आवडणार नसल्याचं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केलं आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विधानानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अमरावतीत एका कार्यक्रमादरम्यान, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल विधान केलं आहे. त्यानंतर भिडेंवर अमरावती पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.
मी शिर्डीत..म्हणूनच कोल्हापुरचा पूर टळला, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा अजब दावा…
भुजबळ पुढे म्हणाले, संभाजी भिडे खरं म्हणजे मनोहर भिडे आहे. मागील दिवसांत भिडेंनी आंब्यांच्या संदर्भात विधाने केली होती. त्यानंतर आम्ही न्यायलयात गेलो होतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महात्मा गांधींबद्दलचं भिडेंचं विधान आवडणार नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाही, संभाजी भिडेंवर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे. त्यांच्याबरोबर जाणे म्हणजे आत्मघातकी आहे, कारवाई कडक होत नाही, म्हणून ते रोज नवीन नवीन काहीतरी बोलत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
Ahmednagar News : ते फिल्मी स्टाईल आले..बस थांबवली..अन् पोरींना घेऊन ते पळाले
देशाचे माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या वडिलांनी सर्व काही दान केलं, स्वत: नेहरु साडेअकरा वर्षे तुरुंगात होते. त्या काळात स्वातंत्र्य मिळणार की नाही? हे माहित नव्हतं. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही, तर भलामन म्हणू नका, स्तुती करू नका, असंही भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी याआधीही वादग्रस्त विधाने केली आहेत. आताही त्यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. भिडे यांच्याविरोधात विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावरुनच अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.