मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीपर्यंतच; पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीपर्यंतच; पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Prithviraj Chavan : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अजित पवारांनी अर्थसंकल्पावरील प्रश्नांना दिलेल्या उत्तरावर असमाधान व्यक्त केलं आहे. (Ajit Pawar) अजित पवार यांच्या भाषणाने आमचं काही समाधान झालेला नाही असं चव्हाण म्हणा्ले आहेत. फक्त लोकप्रियतेसाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

हे पुन्हा येणार नाहीत  Video : अजितदादांचा मूड बदलला! वडेट्टीवारांंसाठी खास शायरी अन् खळखळून हसलेलं सभागृह

महाराष्ट्राचा देशात ११ क्रमांक आहे हे सरकारने कबूल केलं आहे असा टोला लगातवत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळली आहे असंही चव्हाण म्हणालेआहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी आर्थिक सल्लागार नेमली आहे. दरम्यान, शासनाने लाडकी बहीण योजना आणली आहे. परंतु, त्यावरचा खर्च अर्थमंत्र्यांनी दाखवलेला नाही असंही चव्हाण म्हणाले आहेत. निवडणुकीपर्यंत ही योजना आहे आणि त्यानंतर आपण राहणार नाही याची जाणीव त्यांना आहे असा थेट टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

विरोधकांसाठी शेरोशायरी

यावेळी अजित पवारांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलं आहे. ‘विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवारांनी भाषणात काही चांगले मुद्दे मांडले आहेत. त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी मी काही ओळी म्हणून दाखवतो’ असं म्हणत अजित पवारांनी एक शेर वाचून दाखवला.

…प्यार करोगे, तो प्यार करेंगे
हाथ मिलाओगे, तो हाथ भी मिलाएंगे
गले मिलोगे तो गले भी मिलेंगे
सितम करोगे तो सितम करेंगे
हम आदमी है तुम्हारे जैसे
जो तुम करोगे, वो हम करेंगे!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube