… तेव्हा नागपूरच्या दोन नेत्यांमुळे गोपीनाथ मुंडे करणार होते काँग्रेसमध्ये प्रवेश; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

Prithviraj Chavan On Gopinath Munde : राज्यातील लोकप्रिय आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते असा दावा राज्याचे

Prithviraj Chavan On Gopinath Munde

Prithviraj Chavan On Gopinath Munde : राज्यातील लोकप्रिय आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा करत नागपुरातील दोन नेत्यांमुळे गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले की, मी राज्याचा मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. काँग्रेसमध्ये (Congress) येण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी केंद्रात मंत्रीपद देण्याची अट घातली होती. मला केंद्रात मंत्री करा, अन्यथा नागपूरचे (Nagpur) दोघे मला निवडून येऊ देणार नाहीत अशी त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती असं या मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

गोपीनाथ मुंडेंना मनमोहन सिंग यांचा विरोध

तर या मुलाखतीमध्ये पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मंजुरी दिली होती मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रवेशाला विरोध दर्शवला होता. विरोधी पक्षातील खासदाराला आपल्या पक्षात आणून थेट मंत्रीपद देणे योग्य ठरणार नाही असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका होती असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच या संपूर्ण घडामोडीदरम्यान मी थेट पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याकडे न जाता सोनिया गांधी यांच्याकडे गेलो याचा मला आजही पश्चाताप होतो असेही या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

तुम्ही माझा राजकीय खून केला

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी चव्हाण यांना सांगितले की, विरोधी पक्षाच्या नेत्याला आपल्या पक्षात आणून मंत्री करणे ही गोष्ट ते अजिबात करणार नाही. तुम्ही माझा राजकीय खून केला आहे असं पंतप्रधान मनमोहन सिंग चव्हाण यांना म्हणाले असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे. तसेच त्यांच्या राजकीय आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती.

पोलिसांचे मनोबल वाढवण्याचे काम लोकप्रतिनिधींनीच केले पाहिजे; मंत्री विखेंनी टोचले आमदार जगतापांचे कान

मंत्रिमंडळ बनवण्याचा अंतिम अधिकार पंतप्रधानांचा असतो आणि त्यांना न विचारता सोनिया गांधींच्या मंजुरीवर निर्णय घेणे ही चूक होती, जी ते कधीही विसरु शकत नाहीत असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

follow us