महाराष्ट्रातील युवकांना आता जर्मनीमध्ये रोजगार : शिंदे सरकारचा बाडेन बुटेनबर्गशी करार
मुंबई : युरोपातील देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिंदे सरकारने (Shinde Government) जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या औद्याोगिकदृष्ट्या अतिप्रगत राज्याशी सामंजस्य करार केला आहे. केंद्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर बाडेन बुटेनबर्ग राज्याचा मंत्री गट आणि महाराष्ट्र राज्याचा मंत्री गट यांच्या औपचारिक चर्चा झाली. त्यानंतर काल (रविवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. (provide employment to the youth of Maharashtra, the Shinde government has signed an MoU with the industrially advanced state of Baden-Butenberg in Germany.)
मिळालेल्या माहितीनुसार, या उपक्रमासाठी राज्य सरकारने शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी, उद्याोग, कामगार आणि कौशल्यविकास आणि उद्याोजकता या विभागांचे मंत्री आणि सचिवांचा कृतीगट स्थापन केला आहे. या करारानुसार, बाडेन बुटेनबर्ग या राज्याने नोंदविलेल्या मागणीच्या आधारे विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, ऊर्जा व पर्यावरण, आरोग्य, हॉटेल व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रांसासाठी कुशल मनुष्यबळास जर्मनीला पाठविण्यात येणार आहे. याशिवाय अतिरिक्त प्रशिक्षण, रोजगाराची हमी, देशांतराची प्रक्रिया, रहिवासाचा कालावधी आदींबाबत समिती नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणार आहे.
विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून प्रशिक्षण :
युरोपीयन देशांना त्यांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याच्या उपक्रमाच्या अनुषंगाने दीर्घकालीन प्रयत्न आवश्यक असल्याने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीवर लक्ष केंद्रित केले जाईल. त्यासाठी पारंपरिक शिक्षणाबरोबरच जर्मनी किंवा युरोपियन देशांना अपेक्षित तंत्रकौशल्य, व्यवसाय शिक्षण, जर्मन आणि अन्य भाषा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून दिले जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.
कशी असणार प्रक्रिया?
बाडेन बुटेमबर्गचे सेवा कार्यालय पुण्यात सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाकडे जर्मनीतून आवश्यक मनुष्यबळाची मागणी येईल. त्यानुसार महाराष्ट्रात विविध भागांतून बाडेन बुटेमबर्गला कुशल मनुष्यबळ पाठवण्याची प्रक्रिया होईल. त्यासाठी एका खासगी कंपनीशी भागीदारी करण्यात आली आहे. ही कंपनी आयटीआयसारख्या संस्थांतून कुशल मनुष्यबळाची निवड करणार आहे. त्यानंतर जर्मन भाषेचे शिक्षण आणि अन्य प्रशिक्षण दिले जाईल. येत्या काळात आयटीआयना थेट जोडून घेतले जाणार आहे