पुण्यात DJ, प्लाझ्मा आणि लेझरविरोधात जनजागृती सभा; रविवारी गुडलक चौकात होणार मेळावा
Ganeshotsav ही सभा कोणत्याही प्रकारचा मोर्चा किंवा आंदोलन नसून, जनजागृती आणि प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
Pune Ganeshotsav Awareness Meet Against DJs: गणेशोत्सवातील DJ चा दणदणाट, प्लाझ्मा आणि लेझर यांसारख्या आरोग्यविघातक गोष्टींवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी पुण्यातील नागरिक एकत्र येणार आहेत. रविवार, 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गुडलक चौकात ‘सुजाण पुणेकर नागरिकांची प्रबोधन सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
सरकारवर भरोसा नाही, आपला पक्ष अन् नेता कोणीही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले
ही सभा कोणत्याही प्रकारचा मोर्चा किंवा आंदोलन नसून, जनजागृती आणि प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. प्रशासन, राजकीय प्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांपर्यंत नागरिकांची भूमिका पोहोचवण्याचा या सभेचा उद्देश आहे.
DJ, प्लाझ्मा आणि लेझरवर बंदीची मागणी
गणेशोत्सवात मोठ्या आवाजातील DJ, तसेच प्लाझ्मा आणि लेझरच्या वापरामुळे आरोग्यावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे अशा गोष्टी टाळून गणेशोत्सव अधिक सुरक्षित आणि सुसंस्कृत पद्धतीने साजरा करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येणार आहे.
सरकारवर भरोसा नाही, आपला पक्ष अन् नेता कोणीही नाही; जरांगे पाटील स्पष्टच बोलले
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, या सभेचा उद्देश प्रशासन किंवा गणेशोत्सव मंडळांना विरोध करणे हा नाही. उलट, गणेशोत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे जतन करत सण अधिक आनंददायी आणि सर्वांसाठी सुरक्षित करण्यासाठी संवाद घडवून आणणे, हा या उपक्रमामागील हेतू आहे.
‘आम्ही गणपतीच्या बाजूचे आहोत’
या सभेबाबत आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, “आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाही आणि गणेशोत्सव मंडळांच्याही विरोधात नाही. आम्ही गणपतीच्या बाजूचे आहोत.”
गणपतीला बुद्धीची देवता मानून विवेक आणि जबाबदारीच्या मार्गाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या सभेकडे आंदोलन म्हणून नव्हे, तर पुणेकरांच्या सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमाकडे पाहावे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
प्रशासन आणि पोलिसांचे सहकार्य
सभेचे आवश्यक नियोजन करण्यात आले असून, प्रशासनाला या कार्यक्रमाची पूर्वकल्पना देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच कार्यक्रमासाठी प्रशासन आणि पोलिसांचे सहकार्य मिळत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
जरांगे फक्त प्यादा, मराठा आंदोलनामागे एकनाथ शिंदे; गुणरत्न सदावर्तेंचा मोठा दावा
दरम्यान, या सभेबाबत काही राजकीय आणि छुप्या राजकीय अजेंड्याने प्रेरित व्यक्तींकडून नकारात्मक पोस्ट केल्या जात असल्याचा आरोपही आयोजकांनी केला आहे. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या हेतूंवर शंका घेणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘पुण्याच्या संस्कृतीसाठी एकत्र या’
पुणे आणि पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी शांततेत आणि जबाबदारीने या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“आपला आवाज आपल्याच लोकांपर्यंत पोहोचवूया. आपला समाज, आपले शहर आणि आपले सण अधिक आनंदी आणि सुसह्य बनवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया,” असा संदेश आयोजकांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil : जात पडताळणी समिती रद्द करा; जरांगे पाटलांची मोठी मागणी
गणेशोत्सवातील DJ, प्लाझ्मा आणि लेझरच्या वापरावरून पुण्यात आधीच चर्चा सुरू असताना, 30 ऑगस्ट रोजी गुडलक चौकात होणाऱ्या या प्रबोधन सभेकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.