Maharashtra Politics : ठाकरेंची माहिती दिशाभूल करणारी राहुल शेवाळेंचा आरोप
नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या घटनेसंदर्भात दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होती, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले ठाकरेंनी सांगितलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी जी माहिती दिली ती पक्षाच्या घटनेबाबत दिशाभूल करणारी माहिती आहे. ठाकरेंनी सहानुभूतीसाठी पत्रकार परिषद घेतली बाकी त्यांचा दुसरा कोणताही उद्देश नव्हता.
शिवसेनेच्या घटनेवर आयोगाचा आक्षेप आहे त्यामुळे आम्हाला कसली हीअडचण नाही असे शेवाळे यावेळी म्हणाले. ठाकरेंनी त्यांच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही लोकशाहीची प्रक्रिया राबवलेली नाही. तसेच पक्षप्रमुखपदाबाबत कुणाचाच अर्ज नव्हता ते स्वतःच पक्षप्रमुख बनले त्यांनी कधीही निवडणूक घेतली नाही असा आरोप राहुल शेवाळेंनी केला.
आम्हाला कुणाचीही भीती नाही कारण आपमच्याकडे बहुमत आहे, आयोग जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, आम्ही सर्वजण बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहोत, लोकांचा आशीर्वाद हीच आमची संपत्ती आहे. असे राहुल शेवाळे शेवंडी म्हणाले.