Video : भेंडवळ घट मांडणीचं भाकीत जाहीर; शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता तर, सप्टेंबरमध्ये धुवाधार

  • Written By: Published:
Video : भेंडवळ घट मांडणीचं भाकीत जाहीर; शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता तर, सप्टेंबरमध्ये धुवाधार

Bhendwal Ghatmandni Prediction About Rain And Farming : दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात. याच भेंडवळची पावसाबाबत आणि शेतीबाबतचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे. त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी (Farmer) चांगले जाणार आहे. भेंडवळ घट मांडणीची परंपरा मागच्या 300 वर्षांपासून सुरु आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी केली जाते. त्यात 18 प्रकारचे धान्य आणि गोल खड्डा करून त्यात मटकी ठेवली जाते. रात्री ज्या हालचाली होतील, त्याचे निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवलं जातं.

पुणेकरांनो सावधान..! आज जिल्ह्यात अवकाळी बरसणार; हवामानाचा अंदाज काय?

पिक आणि पावसाबाबत यंदाची भेंडवळची भविष्यवाणी काय?

बुलढाणा  जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच घटमांडणीला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात. आज शनिवारी पहाटे ६ वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घट मांडणी करण्यात आली. यानंतर घट मांडणीतील भाकित वर्तवण्यात आलं आहे.

दुबईत कशामुळे झाला इतका पाऊस? कृत्रिम पाऊस की दुसरे काही

यंदा देशाचा राजा कायम राहील. चांगला पाऊस (Rain Forecast) होईल, खरीप पिके साधारण राहतील. रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार, यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल. तर, जुलैमध्ये चांगला पाऊस होईल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.  ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्याबरोबरच सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा चांगला पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अंदाज

शेती पिकांबाबतचा अंदाज काय?

भेंडवळ भविष्यवाणीनुसार यावर्षी खरीप पिके साधारण राहील. त्यात करडी, मटगी, मसूर, तूर, बाजरी, हरबरा, मुंग व उडीद हे पिके साधारण येतील. त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल. पिकांची नासाडी देखील होईल, असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पिक सर्वात चांगलं राहील, असं भाकित देखील वर्तवण्यात आलं आहे. आचारसहिंता सुरू असल्याने यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही. भेंडवळच्या घट मांडणीवेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube