फडणवीस-शिंदेंच्याही मतदारसंघात उमेदवार देणार; राज ठाकरेंची धडकी भरवणारी घोषणा
Raj Thackeray on Assembly Election : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. २२५ ते २५० जागांवर निवडणूक लढवण्याचा मनसेचा मानस आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील विविध भागात दौरे करत आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी काही मतदारसंघांचा आढावा घेऊन उमेदवारही जाहीर केले. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवार देणार का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता.
पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला एकटे पवारचं जबाबदार; राज ठाकरेंकडून पवार पुन्हा टार्गेट
नागपुरात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना धरून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. जातीचे विष पवारांनी कालवलं. संतांची आडनावे राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच केली जाऊ लागली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, सुप्रिया सुळेंचे डोक्यावर पदर घेऊन भाषण, पाहा फोटो…
विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवार जाहीर केले. याचाच संदर्भ घेऊन पत्रकारांनी राज ठाकरेंना शिंदे, फडणवीस यांच्या मतदारसंघाबाबत प्रश्न विचारला. यावर सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार, असं एका वाक्यात सांगत सूचक शब्दांत भूमिका मांडली. यानंतर राज ठाकरे सातत्याने एकदा राज्य हातात द्या, असं आवाहन करत आहेत. यावरही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ठाकरे म्हणाले, राज्यातील जनता एक दिवस हातात राज्य देईल. कारण १९५२ सालापासून भाजपा असंच आवाहन देशातील जनतेला करत आला आहे. तेव्हा जनसंघ होता. २०१४ मध्ये भाजपाला सत्ता मिळाली. वेळा लागतो, असा आशावाद राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार?
आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या वरळीतून उमेदवार देणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मागच्यावेळी जी गोष्ट केली. वरळीत 37 ते 38 हजार आमचे मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कशी होईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहे. लोक माझ्या हाती सत्ता देतील. भाजप 1952 पासून हेच बोलत होते. 2014 ला त्यांच्या हातात सत्ता आली. वेळ लागतो. लोकसभेची वाफ संपली. आता विषय विधानसभेचा आहे. लोकसभेची वाफ निघाली आहे, असंही ते म्हणाले आहेत.