नवी दिल्ली : सामान्य भारतीय माणसाला गुणवत्तापूर्ण रोग निदान सुविधा पुरवण्यासाठी PPP मॉडेल माध्यम हा चांगला पर्याय आहे. PPP मॉडेल (PPP model) हे वर्तमान अन् भविष्यासाठी उपयुक्त आहे, असे मत क्रस्ना डायग्नोटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र मुथा (Rajendra Mutha) यांनी दिल्ली येथे व्यक्त केले. राज्यसभा सचिवालय व संसद टीव्हीच्यावतीने संसद अॅनेक्स भवनात ‘संविधान आणि भारतीय संस्कृती’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ताज अन् ओबरॉय हॉटेलमधील ‘ते’ CCTV फुटेज बाहेर काढा, महाराष्ट्र हादरून जाईल…; उत्तमराव जानकर
यावेळी सभागृहात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, राज्यसभा सचिव व संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजत पुनिया व संपादक राजेश झा, वरिष्ठ शासकीय अधिकारी, नागरिक-विद्यार्थी उपस्थित होते. या संवादसत्रात आजवर विविध मान्यवरांनी संवाद साधलेला आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या मुलाखत रूपातील संवादाने झाले.
PPP मॉडेलच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकाला उपलब्ध होत असलेल्या रोगनिदान सुविधांत शासनासोबत काम करणाऱ्या व यशस्वी उद्योगांचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेत क्रन्सा डायग्नोस्टिक लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र मुथा यांना आमंत्रित करण्यात आले होते.
‘…नंतर समजलं मी चोराकडेच आलेय’; धनंजय मुंडेंवर सारंगी महाजनांचे गंभीर आरोप
यावेळी राजेंद्र मुथा म्हणाले की, आपल्या देशाचे संविधान आणि भारतीय संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजच्या घडीला आपले संविधान सांगते ते आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून जपलेले आहे. आणि ते आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. ‘आरोग्यम धनसंपदा’ यासारख्या गोष्टींचे मोल सांगत समाज घडवणारी आपली संस्कृती आहे. संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकांना मुलभूत हक्क दिले. कर्तव्ये देखील सांगितली आहेत. त्या मुलभूत हक्कांपैकी एक सदृढ आरोग्याचा देखील आहे, अशी माझी धारणा आहे.
पुढे बोलताना मुथा यांनी आरोग्य निदान क्षेत्रात ते करत असलेल्या कार्याबद्दल माहिती सांगितली. त्याचप्रमाणे PPP मॉडेलच्या माध्यमातून अतिशय रास्त दरात ते पुरवत असलेल्या निदान सेवांमुळे होत असलेल्या सकारात्मक बदलांबद्दल माहिती दिली.
राष्ट्रीय आरोग्य मिशन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे त्यांच्या त्यांच्या स्तरावर आरोग्य क्षेत्रांतील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करत असले तरी, आरोग्य निदान सुविधा पुरवण्यासाठी PPP मॉडेलच वर्तमानकाळ आणि भविष्य असल्याचे ठाम मत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
क्रस्ना डायग्नोटिक्स लिमिटेडचा कार्य विस्तार देशातील १५ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशात झालेला असून, ३००० पेक्षा अधिक सेंटरच्या माध्यमातून आणि सरकारच्या सहकार्याने PPP मॉडेलवर चालणारी ही देशातील अग्रगण्य संस्था आहे.
याप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी मुथा यांच्या कंपनीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याला सकारात्मक साद दिली.