…तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, राजू शेट्टींचे खडेबोल
महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम राजभवन, मंत्रालयात घेतला असता तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, या शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या गर्दीतील एकूण 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, यंदाची जनगणना जातीनिहाय करा, अन….
राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला द्यावा हा सर्वस्वी शासनाचा प्रश्न आहे. मात्र, एवढा मोठा कार्यक्रम राजभवन, मंत्रालय किंवा बंदिस्त ठिकाणी करायला हवा होता. पण निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पक्षीय फायद्यासाठी एवढी गर्दी जमवली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
Pravin Darekar : ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’, होर्डिंग लागल्यावर आपण कोठे होतात?
तसेच 25 लाख रुपयांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी सव्वा तेरा कोटी पेक्षा अधिक पैसे खर्च झालेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हे सरकार थांबलयं, अन् इकडं पैशांची उधळपट्टी करीत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
श्री सदस्यांच्या जाण्यानं माझे मन जड झाले आहे; महाराष्ट्र भूषण दुर्घटनेनंतर शाहांचं ट्वीट
दरम्यान, सत्ताधारी सरकार सर्वच बाबतीत राजकारण करत असून हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरु असतानाच राजू शेट्टी यांनी ताशेरे ओढले आहेत.
महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या कार्यक्रमात आत्तापर्यंत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमादरम्यान, उष्माघातामुळे अनेकांना त्रास सुरु झाल्याने लोकांना रुग्णालयात हलवावे लागले होते. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार त्यांच्यावर सुरू होते. रुग्णालयात दाखल असताना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे काल रात्री आठच्या सुमारास गेले होते.