Teacher Recruitment 2026 : राज्यात 30,209 शिक्षक पदांची मेगाभरती; मुलाखतीशिवाय नोकरीची सुवर्णसंधी
Teacher Recruitment 2026 : राज्यात शिक्षक पदांची मेगाभरती सुरु झाली असून पात्र बी.एड आणि डी.एड उमेदवारांसाठी शिक्षक होण्याची सुवर्णसंधी
Teacher Recruitment 2026 : राज्यात शिक्षक पदांची मेगाभरती सुरु झाली असून पात्र बी.एड आणि डी.एड उमेदवारांसाठी शिक्षक होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून पवित्र पोर्टलद्वारे 30 हजार 209 पदांसाठी शिक्षक भरती जाहीर करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीप्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शाळा, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यानिकेतनांमधील रिक्त पदांचा समावेश करण्यात आला आहे. ही संपूर्ण भरतीप्रक्रिया गुणवत्ताधारित आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे.
पात्र उमेदवारांनी 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal) लॉगिन करुन पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करणे अनिवार्य असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह (Sachindrapratap Singh) यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे टीएआयटी 2025 परीक्षेसाठी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या सर्व उमेदवारांना देखील या भरतीप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार आणि पसंतीक्रमानुसार नियुक्तीची संधी मिळणार आहे.
19 हजार 881 पदे मुलाखतीशिवाय
शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भरतीप्रक्रियेत 19 हजार 881 पदांवर केवळ गुणवत्ता आणि नियमानुसार थेट नियुक्ती केली जाणार आहे. तर उर्वरित 10 हजार 328 पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती देखील शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
Spider-Man: Brand New Day ची भारतात 400 कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल-
कोणत्या विभागात किती पदे?
जिल्हा परिषद – 13 हजार 351
खाजगी संस्थांच्या शाळा – 12 हजार 148
आदिवासी विकास विभाग – 2 हजार 421
महानगरपालिका – 1 हजार 954
नगरपालिका व नगरपरिषद – 280
शासकीय विद्यानिकेतने – 56