BHMS Doctor : न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय
BHMS Doctor : न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या
BHMS Doctor : न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशिन आणि सेंट्रल मार्ड या डॉक्टरांच्या संघटनानी केलेल्या विरोधानंतर हा निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
माहितीनुसार, 3 ऑगस्टच्या सरकारच्या निर्णयानुसार, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यात यावी या मागणीसाठी बीएचएमएस डॉक्टरांनी मुंबईत आंदोलन केले होते मात्र होमिओपॅथी डॉक्टरांचा एमएमसीमध्ये समावेश अॅलोपथी डॉक्टरांच्या संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला होता.
बीएचएमएस डॉक्टरांच्या (BHMS Doctor) नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (Maharashtra Medical Council) करण्यात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्डने विरोध केल्यानंतर आता सरकारने दोन्ही बाजूंचा विचार करत मध्यस्थीचा मार्ग अवलंबला आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करुन आता आपली भूमिका देखील जाहीर केली आहे.
मराठी भाषेच्या परीक्षेत राज्यात 7,750 रिक्षाचालक नापास; हजारोंचे ट्रेनिंग अजूनही बाकी-
सध्याची परिस्थिती आणि वातावरण निवळेपर्यंत तसेच नोंदणीची योग्य कार्यपद्धती निश्चित होईपर्यंत नोंदणी थांबवणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करणे संयुक्तिक राहणार नाही असं या पत्रकात सांगण्यात आले आहे.