सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या कथित व्यवहारांची आयकर विभागाची कारवाई न्यायाधिकरणाकडून रद्द

Relief for Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Sunetra Pawar

Relief for Sunetra Pawar Income Tax Department’s action against alleged transactions worth Rs 32 crores quashed by tribunal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांच्या विरोधातील आयकर विभागाने केलेल्या 32 कोटींच्या कथित व्यवहारांची कारवाई आयकर अपील न्यायाधिकरणाकडून रद्द करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana : 26 लाख लाडक्या बहिणींना धक्का, आता मिळणार नाही दरमहा 1500 ; कारण काय?

या प्रकरणामध्ये 2019-20 मध्ये अजित पवार हे काही कथित व्यवहारांचे प्राप्तकर्ते होते. मात्र याबाबत आयटीएटी खंडपीठाला पुरेसा पुरावा न मिळाल्याने हा निर्णय देण्यात आला आहे.दरम्यान आयटीने टाकलेल्या धाडीमध्ये जितेन पुजारी यांच्याकडून ट्रायटन ग्रुपच्या डायऱ्या आणि वह्या जप्त करण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये डी डी नावाच्या व्यक्तीने 32 कोटींचा व्यवहार केल्याचं आयकर विभागाला आढळलं होतं.

विदर्भात एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार; विधान परिषदेसाठी बच्चू कडू घेणार मोठा निर्णय?

त्यानंतर डीडी हे अजित पवार असावेत या तर्कांच्या आधारे कारवाई करण्यात आली. मात्र आयकर विभाग डीडी हा व्यक्ती म्हणजे अजित पवारच होते. हे सिद्ध करण्यात आयटी विभाग अपयशी ठरला असल्याने या प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. म्हणजेच अजित पवार यांच्या कायदेशीर वारसदार म्हणून सुनेत्रा पवार यांना आता आयकर अपील न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जुलै 2020 मध्ये आयकर विभागाने ट्रायटन ग्रुपवर टाकलेल्या छातीमध्ये जितेन पुजारी नावाच्या व्यक्तीकडून काही हस्तलिखित डायऱ्या आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले होते. 32 कोटी रुपयांच्या व्यवहाराची नोंदी आढळल्या होत्या. यांच्यामध्ये डीडी म्हणजेच अजित पवार होते. या आधारे त्यांच्यावर 2019-20 आर्थिक वर्षातील उत्पन्नात 32.14 कोटी त्यावर 70% अधिक दराने कर आकारण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती.

follow us