साखर उद्योगाला दिलासा? राज्य सरकारकडून आर्थिक मदतीसाठी समिती स्थापन

साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 84

Relief for the sugar industry : राज्यातील साखर उद्योग आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. विधानभवनात झालेल्या बैठकीत या समितीला तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यावर सरकारने भर दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, साखर कारखान्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा सखोल अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच ही समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती साखर उद्योगातील आर्थिक अडचणींचे स्वरूप, त्यावरील उपाययोजना, पर्यायी व्यवस्था तसेच उद्योगासाठी आवश्यक आर्थिक पॅकेज याबाबत शिफारसी करणार आहे. या समितीत सहकार, कृषी आणि वित्त विभागाचे सचिव, साखर आयुक्त, उद्योग सचिव तसेच राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश करण्यात आला आहे.

मोदींना अटक होण्यापासून शरद पवारांनी वाचवलं; संजय राऊतांचा पुस्तकात खळबळजनक दावा

समितीचा अहवाल मिळाल्यानंतर राज्य सरकार साखर उद्योगासाठी पुढील धोरणात्मक निर्णय घेणार आहे. दरम्यान, मोठ्या गुळ आणि खांडसारी प्रकल्पांसाठी स्वतंत्र नियमन प्रणाली तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले असून, त्यासंदर्भातील नियमावलीचा मसुदा 15 दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्योगात पारदर्शकता आणि शिस्त वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तसेच साखर उद्योगाला केंद्र सरकारकडूनही मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासाठी साखर कारखाना संघाच्या प्रतिनिधींसोबत केंद्र सरकारशी लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे, बाबासाहेब पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकार साखर उद्योग सशक्त करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत असून लवकरच या क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us