Nilesh Lanke : रोहित पवार, अण्णांनंतर लंकेंचा ही अहमदनगरच्या नामांतराला पाठिंबा

Nilesh Lanke : रोहित पवार, अण्णांनंतर लंकेंचा ही अहमदनगरच्या नामांतराला पाठिंबा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ (Punyashlok Ahilya Devi Holkar Nagar) असे करावे या मागणीसाठी ‘नामांतर रथयात्रा’ (Naamantar Rath Yatra) काढण्यात आली आहे. या यात्रे दरम्यान आता राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी देखील अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याला पाठिंबा दिला आहे.

यावेळी लंके म्हणाले, ‘तुम्ही पद यात्रा सुरू केली. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद, आज जरी एका ग्रामपंचायतीचा ठराव आला असला तरी येत्या आठ दिवसांत 80 टक्के ग्रामपंचायतींचा ठराव नामांतराला पाठिंबा देणारा असेल. मी या आधीच नामांतराला पाठिंबा दिला आहे. कारण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव जिल्ह्याला देणं अभिमानास्पद असणार आहे. कारण अहिल्यादेवींचं जन्मस्थान चौंडी हे आहे.’ असं ही यावेळी लंके म्हणाले.

Ahmednagar Festival : रेडा ठरतोय ‘अहमदनगर महोत्सव – २०२३’ चे आकर्षण

पुढे ते म्हणाले, ‘वेळप्रसंगी आंदोलन जरी कराव लागलं तरी मी तुमच्याबरोबर असणार आहे. विधानभवनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला जाईल. तर येत्या आठ दिवसांत 80 टक्के ग्रामपंचायतींचा ठराव पाठवण्याची जबाबदारी माझी असेल.’

दरम्यान नामांतर रथयात्रेची सुरुवात अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडीपासून करण्यात आली होती. शुक्रवारी या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रथयात्रा श्रीगोंदा पारनेर मार्गे जात असताना राळेगणसिद्धी येथे पोहचली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक ‘आहिल्यादेवी होळकर नगर’ असे नाव देण्यात यावे, या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी अण्णांची भेट घेतल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. अण्णांनी सर्वांचे स्वागत केले, या तुमच्या लढ्यासोबत मी सदैव आहे तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामांतरासाठी योग्य भूमिका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो असे सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube