दादा माझे कुटुंबीय पण बाकीच्यांना साहेबांनी काय कमी केलं होतं? रोहित पवारांचा सवाल

दादा माझे कुटुंबीय पण बाकीच्यांना साहेबांनी काय कमी केलं होतं? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar on NCP Political Crises : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करत जनतेला एकप्रकारे सादच घातली आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ( Rohit Pawar on NCP Political Crises Ajit Pawar family member but whats about Other MLA )

ज्या प्रवृत्तीविरोधात आमचा संघर्ष त्यांच्यासोबत आमचे सहकारी…; शरद पवारांचा हल्लाबोल

काय म्हणाले रोहित पवार?

अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं या गोष्टी अतिशय दुसऱ्या लेव्हलच्या आहेत. तर आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ते म्हणजे लोकांमध्ये जाणं, पवार साहेबांच्या नेतृत्त्वात पक्षाचं संघटन पुन्हा बांधणे त्यात आम्ही त्यांच्यासोबत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. तसेच हा विचारांचा विषय आहे. पण उद्या काय होईल हे कुणालाच सांगता येणार नाही. कदाचित हा प्रयोग कॉंग्रेसवर देखील होऊ शकतो. लोकसभेच्या निवडणुका डिसेंबर तर राज्यातील निवडणुका सहा महिने अगोदर होऊ शकतात. कारण कर्नाटकप्रमाणे लोकसभेला इतर राज्यात भाजपला फटका बसू नये त्यासाठी सुरू आहे. अशी टीका रोहित यांनी केली.

दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा शड्डू; NCPच्या नव्या फळीतील यंग ब्रिग्रेड चर्चेत…

आम्हाला लहानपणापासून प्रेमाविषयी आदराविषयी शिकवलं आहे. त्यामुळे जे होतय ते सकारात्मक पद्धतीने घेऊया. तसेच जे शिंदे गटावर 50 खोके 50 खोके बोलत होते. तेच आता भाजपसोबत जाऊन मंत्रिपदी बसले आहेत. त्यामुळे आम्हाला राजकारणात येऊन चुक केली आहे असं वाटत आहे. त्याचबरोबर अजित पवार हे माझे कुटुंबीय असल्याने मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. कारण त्यांनी मला खुप काही शिकवलं आहे. तर बैठक वेगळ्या कारणासाठी बोलानवी होती झाली वेगळीच. मात्र बाकीचे जे आहेत त्यांना 15 -15 वर्ष मंत्रीपद मिळाली त्यांच्यावर कोणता अन्याय झाला होता. की त्यांनी अशाप्रकारे फूट निर्माण केली आहे. त्याचबरोबर 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.

त्यानंतर शरद पवारांनी देखील शरद पवार यांनी जोरदार निशाणा साधला. ते साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले की, काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. ज्यांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांनी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मोलाची कामगिरी केली, पण तेच लोक ज्या प्रवृत्तीशी आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबत गेल्यामुळे नवीन पिढीचा कार्यकर्ता नामशेष होऊ नये म्हणून आपण आजपासून हा दौरा सुरु केला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube