चाकणकरांना सेक्स रॅकेटच्या सूत्रधार म्हणून आरोपी करण्याबाबत रुपाली ठोंबरेंच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
ठोंबरे यांनी आपल्या पत्रात गंभीर स्वरूपाचे आरोप करत म्हटले आहे की, अशोक खरातने केलेल्या कथित गैरकृत्यांमते रुपाली चाकणकर यांचा पाठिंबा होता.
Rupali Thombre’s sensational claim : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता नवे राजकीय वादंग निर्माण केले आहे. या प्रकरणात आधीच अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असताना, आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे आरोप विरोधकांकडून नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनीच केले आहेत. ठोंबरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चाकणकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
ठोंबरे यांनी आपल्या पत्रात गंभीर स्वरूपाचे आरोप करत म्हटले आहे की, अशोक खरातने केलेल्या कथित गैरकृत्यांमते रुपाली चाकणकर यांचा पाठिंबा होता. खरातला मिळालेल्या या पाठबळामुळेच तो इतक्या मोठ्या प्रमाणावर महिलांची फसवणूक आणि शोषण करू शकला, असा दावा त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, चाकणकर या राज्यातील एका मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा धक्कादायक आरोप देखील ठोंबरे यांनी आपल्या पत्रात केला आहे.
या पार्श्वभूमीवर, ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत चाकणकर यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे देखील नमूद केले आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना, आता या नव्या आरोपांमुळे वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे समोर येतात आणि सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महसूल विभागात मोठा घोटाळा; तहसीलदारांपासून मंडळ अधिकाऱ्यांपर्यंत 152 जण दोषी, सरकारकडून कारवाईची तयारी
रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र पुढीलप्रमाणे –
विषय – रुपाली निलेश चाकणकर हिला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स किट मध्ये सूत्रधार म्हणून आरोपी करणे बाबत.
महोदय,
प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन बरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर पांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करु शकला आहे. रुपाली चाकणकर पानी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकुन अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. न्यावाचत मी आपणास म्वतंत्र माहिती देईल, तमेव भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्याम पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्त्वाच्या बाबी मना माहित असून त्यातील अनेक गोष्टीचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्त्व्याचा बाबी खालीलप्रमाणे
1) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरुद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे मदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे.
2) दि.29/12/2025 रोजी नाजिक ग्रामीण बाबी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क. 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कैप्टन खरात याचा पेंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ती व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून मंदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे.
3) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कैप्टन खरात याला वाचवले.
यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली वाकणकर पांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून सत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.