मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी अध्यपदाला पक्षातूनच विरोध, ‘या’ नेत्याने थेट नोटीसच पाठवली
उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, आता याच निवडीला राष्ट्रवादी पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून मोठी बातमी समोर आली आहे. (NCP) अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांचे नाव चर्चेत आल्यानंतर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यास विरोध झाला होता. त्यानंतर, सुनेत्रा पवार यांच्याकडं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या निवडीला आक्षेप घेत सुनेत्रा पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. मात्र, 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अजित पवारांचे निधन झालं, त्यानंतर, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणा केली. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्यास सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. त्यामुळे, सुनेत्रा पवार यांच्याकडं उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, आता याच निवडीला राष्ट्रवादी पक्षातूनच आक्षेप घेण्यात आला आहे.