तर राष्ट्रवादीचे आमदारही फुटतील; राऊतांनी दिला सूचक इशारा
Sanjay Raut On Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 71 हजार युवकांना नियुक्तीपत्र दिले आहेत. त्यावरुन संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे. हे आता रोजगाराचे पत्रक वाटत आहे. आमच्याकडे ही सर्व काम नगरसेवक करतात तसेच शाखाप्रमुख करतात, असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.
या महाराष्ट्रात भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठीच शिवसेनेची स्थापना झालेली आहे. त्यात शिवसैनिक व मराठी माणसाला रोजगार मिळावा यासाठी आम्ही कायदा करून घेतलेला आहे. आता हे राजकारण आहे. पंतप्रधान जर या ठिकाणी अशी पत्र वाटायला लागली तर सगळ्या देशाच कठीण म्हणावं लागेल, असे ते म्हणाले आहेत. तसेच आमच्याकडे ही पत्रके वाटण्याचे काम नगरसेवक करतात तसेच शाखाप्रमुख करतात, असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.
यावेळी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे जे बोलत आहे ते पूर्णपणे सत्य आहे. माझ्या घरात देखील येऊन त्यांनी हेच बोललेले होते की भाजपासोबत जायला पाहिजे नाहीतर जेलवारी करावी लागेल. आपल्याला हे गठबंधन तोडलं पाहिजे. मी त्यांना एकच सवाल केला की आपल्याला हे असं का करायचं आहे जर पार्टीने आपल्याला संधी दिली आहे तर ती आपण निभावून दाखवू. आपण या दबाव तंत्राला घाबरून न जाता एकत्र लढा दिला पाहिजे. मी त्यांना एकच बोललो जर आपण काही चुकीचे केले नाही तर आपल्याला घाबरून जायचे काही कारण नाही, असे राऊतांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत; फडणवीसाचं मोठं वक्तव्य
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढी मध्ये शौर्य होतं, हे शौर्य आपण दाखवलं पाहिजे. जर तुम्हाला दाढी असेल तर, असा टोला लगावला आहे. परंतु तुम्ही घाबरला आणि इतरांनाही घाबरलात , त्यावेळेला निघून गेलेल्या आमदाराने खासदार त्यांच्यातल्या निम्म्या लोकांवरती ईडीच्या कारवाई होत्या आणि ते घाबरून गेले होते. आत हाच प्रयोग राष्ट्रवादीसोबत सुरु आहे हे सगळ्यांना माहित आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील फुटू शकतात असा इशारा दिला आहे.