शरद पवार एनडीएसोबत जाणार अन् सुप्रिया सुळे मंत्री होणार? संजय राऊत म्हणाले…

Sanjay Raut On Sharad Pawar : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Sanjay Raut On Sharad Pawar

Sanjay Raut On Sharad Pawar : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात सध्या उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीदरम्यान आपण 10  तारखेनंतर एकत्र बसू आणि चर्चा करु असं शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना सांगितलं आहे. तर यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देखील शरद पवार यांना फोन करुन तुम्ही आराम करा सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू असं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार एनडीएसोबत जाणार आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य करत एका वाक्यात उत्तर दिलं आहे. शरद पवार कुठेच जाणार नाही ते आमच्यासोबत राहणार असं त्यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) कुठे जाणार नाहीत. मी खात्रीने सांगतो. प्रफुल्ल पटेल यांना काही म्हणू घ्या. पवार कुठे जाणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील. पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. कुणी गमजा मारत असतील तर त्या खोट्या आहेत. ते आमच्यासोबत राहतील आणि आम्हाला आशीर्वाद देत राहतील असं माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.

तर दुसरीकडे यावेळी संजय राऊत यांनी गोकुळवरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गोकुळच्या बैठकीला 14 चा कोरम लागतो पण लोकांनी कौल दिला आहे. तो कोरम पूर्ण होऊ नये म्हणून फडणवीस यांनी समविचारी पॅनलच्या दोन जागा चोरल्या आहेत. शेवटच्या क्षणी पाच सहा मताने निर्णय फिरवले गेले.

भाजप एक अजब पक्ष, सत्तेत असूनही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे; राज ठाकरेंचा हल्लाबोल

समजा महाडिकांच्या पॅनलला 13 जागा मिळाल्या असत्या आणि सतेज पाटलांना 12 जागा मिळाल्या असत्या तर हा निर्णय घेतला असता का? पाच सदस्य नेमण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला असता का? असा सवाल देखील माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपस्थित केला.

follow us