भोंदू अशोक खरात भाजपचा…, शिवसेना नेते संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
आता आमच्या विरोधात काहीतरी सुरू आहे अस लोकांना वाटल्याने हे प्रकरण बाहेर आलं असा टोलाही खरात यांनी लगावला.
भोंदूअशोक खरातचे नवीन कारनामे रोज समोर येत आहेत. (Kharat) यामध्ये अनेक राजकीय नेतेही अशोक खरातच्या संपर्कात होते हेही समोर आलं आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत निवेदन सादर केल आहे. यामध्ये अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक आरोप केला आहे.
राऊत यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना म्हटले की, नाशिकच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली आहे. पण महिलेने तक्रार करेपर्यंत वाट का पहायची? फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून याची कल्पना हवी होती. त्यांनी तात्काळ धाडी घालून हे प्रकार थांबवायला हवं होतं. हे केलं असत तर अनेकांची आयुष्य वाचली असती, कदाचित प्राण वाचले असते. याला सरकार जबाबदार आहे अस म्हणाव लागेल असंही ते म्हणाले आहेत.
Ashok Kharat : ५ गोळ्या अन् ५ नरबळी? खरातच्या सैतानी; फार्महाऊसमध्ये नक्की कुणाचे सांगाडे?
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, क्रूर कृत्य घडत होती याची माहिती मुख्यमंत्री यांना होती. एका महिलेच्या तक्रारीची तुम्ही वाट पाहत बसलात हे चुकीचं आहे. नाशिक सोडून द्या. नाशिक पोलिसांची ती फॅशन झाली आहे. नाशिक जर कायद्याचा बालेकिल्ला असता तर खरात सारखी प्रकरणं निर्माण झालीच नसती. बीडमध्ये कोण आहे तिथे? हे भाजपचे हस्तक आणि समर्थक आहेत. खरात हा भाजपचा प्रचारक होता. बच्चू कडू यांना आशीर्वाद देतात की भाजपचे मंत्री बनून इथे तुम्ही या. निवडणूक काळात अशोक खरात भक्तांची मदत घेऊन मतदान करा अस सांगत होता.
आता आमच्या विरोधात काहीतरी सुरू आहे अस लोकांना वाटल्याने हे प्रकरण बाहेर आलं असा टोलाही खरात यांनी लगावला. भाजपने याचं प्रायश्चित केलं पाहिजे. तुम्ही सभागृहात काहीही सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. महिलांची बेअब्रू ही राज्यात पहिल्यांदा होत आहे. जप्त केलेले मोबाईल पोलिसांकडे आहेत, ते गृह खात्याअंतर्गत आहे. कायद्याच्या बालेकिल्ल्यातून महिलांचे फोटो येत आहेत हे गंभीर आहे. कोणाचं षडयंत्र आहे हे समोर आल पाहिजे.