शरद पवार शेवटचा डाव टाकणार! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार… पुण्यातल्या गुप्त बैठकीचं गुपित काय?

शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते.

News Photo   2026 05 15T143937.306

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. (NCP) यासंदर्भातील एक गुप्त बैठकही पार पडली असल्याचंही पुढं आलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असा खुलासा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला होता. रोहित पवार देखील याबाबत अनेकदा बोलताना दिसले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडून अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असं म्हटलं गेलं. दरम्यान, आता पुन्हा ही चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख नेते उपस्थित होते. हेच नाही तर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित उपस्थित होते. काही काळ ही बैठक सुरू होती. ही बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली नाही तर एका हॉटेलमध्ये पार पडली.

रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार राहुल गांधींची भेटही घेतली; राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा खळबळजनक दावा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण आहे. हेच नाही तर सुनील तटकरे यांनीही दोन दिवसांपूर्वी अचानक शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल दोन वर्षांपेक्षा अधिक काळानंतर सुनील तटकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी आले होते.
तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांसोबत बोलताना सांगितलं की, शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो होतो असं ते म्हणाले.

पुण्यात पार पडलेल्या या गुप्त बैठकीत सुनील तटकरे आणि शरद पवार यांच्या भेटीबाबतही चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती माहिती मिळत आहे. या बैठकीनंतरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता दोन्ही पक्ष एकत्र येणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

follow us