नगरपरिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांनी एकत्र येत केलेल्या युतीच्या विरोधात शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलचं वर्चस्व

नगरपरिषदेच्या निवणुकीमध्ये शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलने धुराळा उडवला; आनंदा माने यांनी दुसऱ्या फेरीतच निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला

  • Written By: Published:
Untitled Design (133)

Shahajibapu Patil’s panel dominates against the alliance : लक्षवेधी ठरलेल्या सांगोला नागरपरिषदेवर शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. नगरपरिषदेच्या निवणुकीमध्ये शहाजीबापू पाटील(Shahajibapu Patil) यांच्या पॅनलने धुराळा उडवला आहे. शिवसेनेच्या पॅनलचे उमेदवार आनंदा माने यांनी दुसऱ्या फेरीतच निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला होता. या अटीतटीच्या लढतीतील विजयानंतर शाहजी बापू यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. बोलताना त्यांनी शहरवासीयांनी शिवसेनेवर(Shivsena) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(DCM Eknath Shinde) यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्याचे सांगत, एकनाथ शिंदे यांना जनतेचे पाठबळ असल्याची भावना आजच्या या विजयामुळे दृढ झाली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. या निवडणुकीत शाहजीबापू पाटील यांच्या विरोधात सर्वच प्रमुख पक्षांनी एकत्र येत युती केली होती, ज्यामुळे त्यांना एकट्याला या सग्ल्यांविरोधात लढा द्यावा लागला होता. मात्र त्यांच्या या एकतर्फी लढ्याला जनतेने स्वीकारलं असल्याचं या निकालातून दिसून आलं.

अशोक चव्हाणांना धक्का, लोहा नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील 6 भाजप उमेदवारांचा पराभव

माध्यमांशी बोलताना त्यांनी एका महत्वाच्या विषयावर भाष्य केलं. राजकारणात नेते जरी एकत्र आले, तरी जनसामान्यांच्या भावना महत्वाच्या असतात. ते पुढे म्हणाले की, मला याची खात्री होती, जनतेला ही युती मान्य होणार नाही. सांगोला तालुक्याची एक वैचारिक बैठक आहे, जी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांच्या धाटणीत तयार झाली आहे. तसेच, गेल्या 40 वर्षांपासून पाटील यांनी या तालुक्यात एक वेगळी वैचारिक फळी तयार केली आहे, जी या युतीच्या विरोधात होती. जनतेने शिवसेनेला भरभरून पाठिंबा देऊन भरघोस मतदान केल्याबद्दल त्यांनी तमाम मतदारांचे मनापासून आभार मानले.

follow us